computer

व्हिडीओ ऑफ दि डे : छत्तिसगढ मध्ये धावली चक्क २ किलोमीटर लांब रेल्वे ??

भारतीय रेल्वेने एक नवीन इतिहास रचून कमाल केली आहे राव. छत्तिसगढ भागात चक्क ३ मालगाड्या एकत्र करण्यात आल्या होत्या. या लांबलचक ट्रेनची लांबी तब्बल २ किलोमीटर होती तर डब्यांची संख्या १७७ एवढी होती.  हे जोडायला तर कोणीही जोडेल राव, पण रेल्वे विभागाने ही ट्रेन यशस्वीपणे चालवून दाखवली आहे. हा पाहा व्हिडीओ.

मंडळी, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेने (SECR) हे भन्नाट काम केलं आहे. यासाठी त्यांनी अत्याधुनिक Distributed Power Control System (DPCS) वापरली होती. या सिस्टम मध्ये रेल्वेच्या पुढच्या भागातलं मुख्य इंजिन मागच्या लहानसहान इंजिन्सना इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्समिशनद्वारे एकाचवेळी नियंत्रित करू शकतं

मंडळी, या सिस्टमद्वारे रेल्वेने फक्त इतिहास रचलेला नाही त्याचे काही फायदे पण आहेत. फायदा असा की या सिस्टममुळे रेल्वे ट्राफिक कमी होईल, एकाच वेळी मोठ्याप्रमाणात माल वाहून नेता येईल, माणसांचे श्रम वाचतील आणि मुख्य म्हणजे कार्यक्षमता वाढेल.

या ट्रेनचंच उदाहरण घ्या. या मालगाडीने भिलई ते कोर्बा हे २५० किलोमीटरचं अंतर ६ तासात पूर्ण केलं आहे. हेच काम जर एकेका मालगाडीला दिलं असतं तर प्रत्येक मालगाडीला ७ तास लागले असते. याखेरीज ३ वेगवेगळ्या ट्रेनसाठी तेवढे कर्मचारी पण लागले असते.

DPCS काम कसं करतं ते समजून घेऊया.

DPCS सिस्टम मुख्य इंजिनकडून (लोको) आदेश मिळवण्याचं काम करतं आणि ते इतर इंजिन्सकडे पाठवतं. या कारणाने कर्मचाऱ्यांना स्वतःहून इंजिन्स हाताळण्याची गरज पडत नाही. रायपुर भागात DPCS सिस्टम असलेले ३० रेल्वे इंजिन्स आहेत.

तर मंडळी, रेल्वे विभागाच्या नव्या ‘अॅनाकोंडा’बद्दल तुम्हाला काय वाटतं ? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये येउद्या राव.

सबस्क्राईब करा

* indicates required