एका झोपडपट्टीचा कायापालट...वाचा कुठे आहे हे ठिकाण !!!

झोपडपट्टी म्हटल्यावर नाक मुरडलं जातंच. वाहते नाले, घाण, लहान मोठी घरे, गल्ल्यांमधून फिरणारी शेंबडी पोरं असलं काही आपल्या मनात नक्कीच येईल पण याच झोपडपट्टीचा कायापालट केल्यावर काय होतं ते इंडोनेशियातल्या या गावाला बघून कळून येईल.

स्रोत

२२३ घरांचा समूह असलेल्या या गावाला त्याच्या बदलेल्या रुपामुळे ‘रेम्बो व्हिलेज’ म्हटलं जातंय. ‘Kampung Pelangi’ असं या गावाचं नाव. साधारण गाव, किंवा वस्ती जशी असते तसेच हे ठिकाण पण याचं रूप बदललं एका महत्वाच्या कामगिरीने.

स्रोत

स्थानिक सरकारच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीने गावातल्या प्रत्येक घराला कमीत कमी ३ वेगवेगळ्या रंगांनी रंगवण्यात आले आणि बघता बघता हे साधारण गाव पर्यटकांच मुख्य आकर्षण बनलं आहे मंडळी. फक्त रंगवून हे काम थांबलं नाही तर काही भिंतींना चित्रांनी सजवण्यात आलं, त्यामुळे आकर्षणात आणखीच भर पडली आहे

स्रोत

Image result for Kampung Pelangi beforeस्रोत

शेवटी एक विचार आला. आपल्या मुंबईत एवढ्या झोपडपट्या आहेत त्यातील काहींना असचं सजवलं तर ?

Image result for thinking memeस्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required