computer

पोलिसाला प्रि-वेडिंग शूटमध्ये घेतलेली लाच कशी भोवली पाहा !!

सध्या भारतात प्रि-वेडिंग फोटोशूटचे फॅड जोरात आहे. लग्नाला कमी खर्च केला तरी चालेल, पण प्रि-वेडिंग दणकेबाज व्हायलाच पाहिजे हा दृष्टीकोन समाजात हळूहळू रुजत चालला आहे. जसजसा हे फॅड वाढतेय तसतशा प्रि-वेडिंगच्या एकापेक्षा  एक थीम्स येत आहेत. काही प्रि-वेडिंग तर अर्धे सिनेमेच असतात राव!! एखाद्या सुंदर ठिकाणी जाणे, गाडीवर फिरणे, ड्रोनने शूटिंग करणे याच प्रकारे सर्वसाधारण प्रि-वेडिंग शूट होत असतात.

पण राजस्थानच्या एका गड्याने भन्नाट डोक्यालिटी लावली राव!! पण आयडीया केली आणि खड्ड्यात गेली अशी त्याची गत झाली. काय झाले नेमके चला जाणून घेऊया!!

राजस्थानच्या धनपत येथे एका पोलीस अधिकाऱ्याचे लग्न जमले. प्रि-वेडिंग तर सगळे करतात आपण थोडे वेगळे करू असे म्हणत त्याने नामी शक्कल लढवली. शूटिंगमध्ये असे दाखवले आहे की त्याची होणारी बायको त्याला लाच द्यायला येते. ती त्याच्या खिशात काही पैसे टाकून निघून जाते. नंतर त्या पोलिसाला समजते की आपले पाकीट त्या बाईने मारले आहे. मग तो तिला पकडायला जातो आणि तिथे गेल्यावर तो तिच्या प्रेमात पडतो अशी त्या प्रि-वेडिंगची थीम आहे. वरवर पाहता किती रोमँटिक थीम आहे, असेच तुम्ही म्हणाल पण या गड्याला थेट त्याच्या सिनियर अधिकाऱ्यांची नोटीस आली राव!!

एकतर पोलीस वर्दी घालून शूट केले. वरून पोलिसाला लाच घेताना दाखवले यावरून पोलिसांची बदनामी होते आणि पोलिसांबद्दल समाजात चुकीचा संदेश जातो असे त्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे! त्यांचे पण बरोबर आहे राव!! 

आजवर सिनेमांमध्ये पोलिसांना लाचखोर दाखवायचे. आता जर पोलीस स्वतःच स्वत:ला लाचखोर दाखवू लागले तर कसे चालेल? नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required