दिनविशेष : १८५७ ची रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा १६२ वी पुण्यतिथी !!

झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हटलं की १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम आठवतो. १८५७!! भारताचं स्वातंत्र्यसमर. या युद्धानं ब्रिटिश साम्राज्याला पाहिलं आव्हान दिलं होतं. या आव्हान देणार्यां लोकांमध्ये एक तेजस्वी ज्योत होती. अवघ्या बावीस वर्षांची, महान पराक्रमी, करारी आणि तितकीच कणखर. लहानपणीची मणिकर्णिका आणि आता झाशीची राणी लक्ष्मीबाई!!
ज्यावेळी संपूर्ण भारतावर ब्रिटीश हुकुमत येत होती त्यावेळी झाशी मात्र लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली सुरक्षित होतं. पण ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने झाशी खालसा करण्याचा निर्णय घेतला आणि सगळंच बदललं. ब्रिटीश राज्य खालसा करण्यापर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी झाशी संस्थान ब्रिटीश सरकारात विलीन केलं. त्यावेळी मात्र झाशीची राणी पेटून उठली. 'मी माझी झाशी देणार नाही‘ असे उद्गार काढून तिनं ब्रिटिशांना आव्हान दिलं. पुढे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंग्रजांशी लढा देत तिने १८ जून, १८५८ साली मरण कवटाळले.
अशा चतुर, धोरणी, थोर, शूर, युद्धशास्त्रपारंगत आणि जिचा उल्लेख ब्रिटिशांनी ’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला त्या झाशीच्या राणीचा आज जन्मदिन. बोभाटा तर्फे आम्ही त्यांच्या स्मृतींना सलाम करून पुढील ओळी अर्पण करत आहोत.
जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी,
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनासी,
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी,
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी.
तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी.
-सुभद्रा कुमारी चौहान
रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली ll ध्रु ll
तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणू जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll
घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगी तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर इथें आली ll २ ll
कडकडा कडाडे बिजली,
शत्रूंची लष्करे थिजली,
मग किर्तीरुप ती उरली,
ती हिंदभूमीच्या, पराकमाची इतिश्रीच झाली ll ३ ll
मिळतील इथें शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll
- भा. रा. तांबे