'शेतकऱ्यांना मिळणार ३००० रुपये पेन्शन'...वाचा काय आहे व्हायरल मेसेज मागील सत्य !!

मंडळी, महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ताजा असताना व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमध्ये लिहिलं आहे की ५५ वर्ष पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. तर तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांना माहिती द्या !!

राव, काय खरंच शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे ? काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य? चला जाणून घेऊ !!


सर्व फोटो स्रोत

मंडळी, या मेसेजमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरकारचं विधेयकही दिसून येत आहे. त्यामुळे वरवर बघता हा मेसेज खरा आहे असं वाटू शकतं. पण सत्य काही औरच आहे !!

फोटोत दिसणारे विधेयक हे कॉंग्रेस आमदार ‘रामहरी रुपनवार’ यांच्याकडून मांडण्यात आलेलं ‘खाजगी विधेयक’ आहे. हे खाजगी विधेयक म्हणजे कोणत्याही आमदाराने स्वतंत्रपणे मांडलेलं विधेयक. जोपर्यंत सरकारतर्फे हे विधेयक मंजूर होतं नाही तोपर्यंत याला काहीच किंमत नाही.

जर सरकारला शेतकऱ्यांच्या पेन्शन संदर्भात हे विधेयक पसंत पडलं तर शेतकऱ्यांना नक्कीच महिन्याला पेन्शन मिळेल. आपण तूर्तास तरी हा कायदा अंमलात आणावा म्हणून फक्त आशाच करू शकतो.

पण मंडळी, हा चुकीचा मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा आमची ही खरी माहिती सांगणारी पोस्ट शेअर करा  आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा !!

 

© बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required