जीन्समधला हा खिसा देण्यामागचं मूळ कारण तर जाणून घ्या...

आपल्या रोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये काही गोष्टी असतात ज्याचा वापर तर आपण नेहमी करतो, पण त्या वस्तू नेमक्या कधीपासून आणि कशासाठी अस्तित्वात आल्या याची खरी गोष्ट माहित असेलच असे नाही. आता जीन्स सगळेच वापरात. तिला मोठ्या खिशात अजून एक लहानसा खिसा असतो. आपण त्यात नाणी ठेवतो. अनेकदा लहान आकाराच्या वस्तू त्या आडून आपल्याला लपवता येतात. हा खिसा नेमका कशामुळे अस्तित्वात आला हेच तर आपल्याला माहीत नसते.
आज खरंतर या लहान खिशाची काही गरज उरलेली नाही. कारण ज्यावेळी हा खिसा जीन्समध्ये देण्यास सुरुवात झाली त्यामागील कारणच आता संपले आहे. सध्या डिजिटल जमाना आला असला तरी घड्याळाचे महत्व संपलेले नाही. सध्यातर घड्याळेच डिजिटल झाली आहेत. आता तुम्ही म्हणाल जीन्समधील खिशाचा विषय सुरू असताना हे घड्याळच कुठून मध्ये आले? तर ऐका, या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध आहे.
जीन्समधला हा खिसा घड्याळ ठेवण्यासाठी देण्यात आला होता. आता लोक घड्याळ हातात घालायचे सोडून खिशात कशासाठी ठेवतील हा रीतसर प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुम्हाला जुन्या काळी पॉकेट वॉच असत. या वेगळ्या प्रकारच्या घड्याळी जुन्या हॉलिवूड सिनेमांमध्ये दिसू शकतील. १८ व्या शतकात ज्यावेळी लिव्हाईस कंपनीने जीन्स मार्केटमध्ये आणल्या होत्या. त्यावेळी या घड्याळांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे.
लोकांना आपले घड्याळ सुरक्षितरित्या खिशात ठेवता यावे यासाठी सुरुवातीपासूनच लिव्हाईस आपल्या जीन्समध्ये हा खिसा देऊ लागली. त्यानंतर इतरांनी देखील या गोष्टीचे अनुकरण करायला सुरूवात केली आणि हा खिसा सर्वत्र दिसू लागला. पुढे जाऊन खिश्यातली घड्याळे हातावर आली आणि त्याचे काम संपले. तरीही आपल्या ओरिजिनल डिझाईनचा आदर म्हणून कंपनीने हा खिसा तसाच राहू दिला.
इतर कामांसाठी या खिशाचा वापर होत असल्याने इतर जीन्स कंपन्यांनी हा खिसा देखील तसाच राहू दिला आणि हा छोटा खिसा जीन्समध्ये देण्याची पद्धत सुरू झाली.