LIC मध्ये 'Assistant Administrative Officer' पदासाठी भरती सुरु झालीये भाऊ...एका क्लिकवर सविस्तर माहिती घ्या !!!

आज आम्ही LIC मध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत. LIC च्या Assistant Administrative Officer (AAO) या महत्वाच्या पदासाठी भरती सुरु झाली आहे. ५९० जागांसाठी ही भरती होणार आहे. चला तर या पदाविषयी सविस्तर माहिती घेऊया.
Assistant Administrative Officer हे पद LIC मधलं एक महत्वाचं पद आहे. या पदावर नेमणूक झाल्यास ती व्यक्ती LIC च्या क्लास १ ऑफिसर्स मध्ये गणली जाते. तसं पाहायला गेलं तर LIC च्या तळापासून सुरुवात केली तर या पदावर पोहोचण्यासाठी जवळजवळ १० वर्ष लागतात, पण AAO साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमुळे आपण त्या पदावर थेट पोहोचू शकतो. तसा हा मार्ग सोप्पा नाही, तेवढीच मेहनत आणि जिद्द लागते. चला तर आता जास्त वेळ न दवडता या पदाच्या महत्वाच्या माहितीकडे वळूया.
वयोमर्यादा : वय वर्ष २१ ते ३०.
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, कॉमर्स पदवीसोबत CA, B.E., B. Tech (Computer Science), Master Degree (हिंदी),
जागा : सामान्य – २३७, आर्थिकदृष्ट्या मागास – ५९, OBC – १४४, SC – ९२, ST – ५८ (एकूण ५९० पदे.).
आता पाहूयात शैक्षणिक पात्रतेनुसार एकूण जागांचे वाटप.
सामान्य – ३५०, IT – १५०, CA – ५०, Actuarial – ३०, राजभाषा – १०.
परीक्षा शुल्क : सामान्य/ OBC – ६००, SC/ST/अपंग – १००
वेतनश्रेणी : ३२,७९५ ते ६२,३१५ (प्रत्येकी महिना)
अधिक माहितीसाठी https://www.licindia.in/Bottom-Links/Careers/Recruitment-of-Assistant-Administrative-Officer-20 या वेबसाईटला भेट द्या.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कसा करायचा. तर, तुम्हाला अर्ज फक्त ऑनलाईन भरता येऊ शकतो. यासाठी LIC च्या https://ibpsonline.ibps.in/licaaofeb19/ पोर्टलवर जा. तुम्ही जर यापूर्वी नाव रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरने सहज लॉगीन करता येऊ शकतं. तुम्हाला नवीन रजिस्टर करायचं असेल तर ‘Click here for New Registration’ वर क्लिक करून तुम्ही रजिस्टर होऊ शकता.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : २२ मार्च, २०१९.
चला तर मग पठ्ठ्यांनो लागा कामाला. LIC च्या महत्वाच्या पदी आपला मराठी माणूस दिसला पाहिजे !!