computer

ओदिशातल्या लाल मुंग्यांच्या चटणीला मिळाले आहे जीआय मानांकन!! वाचा या विचित्र चटणीबद्दल..

लाल मुंग्यांची चटणी. नाव वाचूनच कळालं असेल की आज काहीतरी सुरस आणि रंजक माहिती वाचायला मिळणार. ओडीसा राज्यात आदिवासी लोकांत खाल्ल्या जाणाऱ्या या चटणीला नुकताच जी आय नामांकन मिळालं आहे. त्याविषयीच थोड जाणून घेऊयात.

ओडीसा राज्यातील मयूरभंजमध्ये काही आदिवासी लोक लाल मुंग्यांची चटणी अगदी चवीने खातात. ही चटणी रुचकर तर असतेच, पण आरोग्यासाठी देखील अतिशय गुणकारी मानली जाते. ही चटणी विवर मुंग्यांपासून बनवली जाते. या मुंग्या झाडाच्या पान एकमेकांत विणून त्याचं घर बनवतात म्हणून त्यांना विवर मुंग्या म्हटलं जात. त्यांना मॉस मुंग्या देखील म्हणतात. त्यांनी झाडाच्या पानापासून बनवलेल्या अंडाकृती आकाराच्या घरावर जोराचा वारा पाऊस यांचा काहीच परिणाम होत नाही.

मॉस मुंग्यांच्या कुटुंबात कामगार मुख्य कामगार आणि राणी असे तीन प्रकारचे सदस्य असतात. या मुंग्या खाण्यासाठी प्रामुख्याने शिकार करतात. यामध्ये लहान कीटक, माश्या असतात. काहीवेळा पिकांवरती हल्ला करणाऱ्या कीटकांपासून या मुंग्या पिकांचं संरक्षण करतात.

मयूरभंजमधील आदिवासी लोक या मुंग्यांची चटणी अगदी आवडीने खातात. ही चटणी विणकर मुंग्यांपासून बनवली जाते. या मुंग्या गोळा करण्यासाठी त्यांची घरटी झाडापासून वेगळी करून पाण्यात ठेवली जातात. हे काम करताना त्यांना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते.

ह्या मुंग्यांपासून बनवलेली चटणी आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. ही चटणी फ्लू, सर्दी, डांग्या खोकला या आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापरली जाते. या चटणीमुळे भूक वाढते आणि दृष्टी देखील सुधारते. या मुंग्यांपासून तिथले आदिवासी तेल देखील बनवतात जे लहान बाळांचे मालिश करण्यासाठी वापरले जाते. हे तेल संधिवात आणि हर्पिस सारखे त्वचा रोग बरे करण्यासाठी देखील वापरले जाते. तेथील अदिवासी याच चटणीचा वापर औषध म्हणून नेहमी करतात.

नुकतेच या चटणीला जी आय नामांकन मिळालं आहे. जी आय नामांकन हे एखाद्या विशिष्ठ परिसरातील कृषिविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित मालासाठी वापरले जाते. या मालाचाचे उत्पादन एका विशिष्ठ प्रदेशातच होते हे या नामांकनामुळे सिध्द होते. जी आय नामांकन असणाऱ्या उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते. यामुळे उत्पादकांची आर्थीक समृद्धी होते. एकदा हे नामांकान मिळाले की इतर कोणताही उत्पादक त्याच प्रकारचे कोणतेही उत्पन्न घेऊ शकत नाही किंवा बेकायदेशीरपणे विकू शकत नाही. या नामांकानाचे दर १० वर्षांनी नुतनीकरण होत असते.

सबस्क्राईब करा

* indicates required