तुमच्याकडे 3G मोबाईल आहे? आता तुमच्यासाठी जिओ आणतंय नवी खुशखबर..

 

         सप्टेंबरपासून रिलायन्स जिओ  देशभरात  चांगलंच गाजतंय. ज्याच्यात्याच्याकडे जियोची सिम आणि वायरलेस  डॉंगल्स आहेत.  जियोनं ग्राहकांना फुकट  4G इंटरनेट आणि वॉईस कॉल देऊन इतर कंपन्यांच्या नाकी नऊ आणलेत.  

पण आजवर  जिओचं सिम  वापरायला 4G मोबाईलमध्येच वापरता येतं होतं. त्यामुळंही अनेकांनी नवीन 4G स्मार्टफोन खरेदी केले. पण आता  ज्यांच्याकडे फक्त  3G मोबाईल आहेत, त्यांच्यासाठीही एक बडी खुशखबरी आहे. 

        एका बातमीनुसार जानेवारी २०१७ पासून जिओचं सिम हे आता 3G स्मार्टफोनवाल्यांनाही वापरता येणार आहे. त्यासाठी जिओकडून या महिन्याच्या शेवटी एक विशेष अॅप लॉन्च केलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय. ज्यामुळे हे सिम 3G मोबाईलमध्ये वापरणं शक्य होईल.

          या बातमीत किती सत्यता आहे हे आम्ही सांगू शकत नाही. पण अवघ्या ८३ दिवसात ५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार करणारी रिलायन्स जिओ 3G ग्राहकांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी हे पाऊल नक्कीच उचलू शकते. तेंव्हा नवा 4G हॅण्डसेट घेण्यापेक्षा नवं जिओ सिम घेऊन तयार रहा.

सबस्क्राईब करा

* indicates required