चपलांच्या डॉक्टरला मिळाला नवा दवाखाना...आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला राव !!

मंडळी, जखमी चपलांचा डॉक्टर आठवतोय का? या डॉक्टरचं नवं ‘हस्पताल’ बनून तयार झालंय राव. अहो, म्हणजे त्यांच्या दुकानाचं रुपांतर एका शानदार दुकानात झालंय.

एप्रिलमध्ये आम्ही बातमी दिली होती की आनंद महिंद्रा यांना नरसीराम यांची अनोखी मार्केटिंग स्टाईल भारी आवडली आहे. दुकानाचं नाव ‘जखमी जुतों का हस्पताल’ आणि स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लिहिण्यामागचं डोकं एखाद्या मार्केटिंग  शिकवणाऱ्या व्यक्तीचं असावं असं त्यांना वाटलं होतं. त्यांनंतर त्यांनी नरसिराम यांना मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी आपला शब्द पाळला असून नरसिराम यांना नवीन दुकान थाटून दिलंय राव. हे दुकानही या ‘डॉक्टर’ला शोभेल असंच आहे. 

चला आधी हे नवीन दुकान बघून घ्या भाऊ !!

मंडळी, आनंद महिंद्रा यांनी नरसिराम यांचा शोध घेऊन त्यांना काही मदत हवी आहे का विचारल्यावर नरसिराम यांनी फक्त एका चांगल्या दुकानाची मागणी केली होती. त्याबरोबरच महिंद्रा कंपनीची टीम कामाला लागली होती. ३ महिन्यांनी हे दुकान तयार झालं आहे.

नरसिराम यांच्या व्हायरल झालेल्या  फोटोत  त्यांचं रस्त्याच्या कडेला असलेलं छोटं दुकान दिसतंय. त्याच्या अगदी समोरच हे नवीन दुकान आहे. आज खऱ्या अर्थाने या डॉक्टरचं क्लिनिक तयार झालं असं आपण म्हणू शकतो.

स्रोत

मंडळी, आनंद महिंद्रा यांनी अनेकदा अशी मदत करून सगळ्यांना चकित केलं आहे. आता गेल्यावर्षीचा किस्सा घ्या ना. एका रिक्षा चालकाने रिक्षाचं रुपांतर स्कॉर्पिओ एसयुवी मध्ये केलं होतं. ह्या रिक्षाचा फोटो जेव्हा आनंद महिंद्रा यांनी पाहिला तेव्हा त्यांनी ही रिक्षा ‘महिंद्र म्युझियम’साठी विकत घेतली आणि त्या बदल्यात रिक्षा चालकाला नवी कोरी ‘महिंद्र सुप्रो मिनी व्हॅन’ गिफ्ट केली. 
आहे ना कमाल ?

 

आणखी वाचा :

रिक्षाचे रुपांतर स्कॉर्पिओ मध्ये...वाचा पुढे काय झाले !!!

जखमी चपलांच्या हॉस्पिटलमध्ये आनंद महिंद्रा का गुंतवणूक करत आहेत ?

सबस्क्राईब करा

* indicates required