वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई - २६ जुलैच्या पावसाचे थैमान दृश्य रुपात!!

२६ हा आकडा कदाचित मुंबईकरांच्या पाचवीला पुजलाय राव. २६ नोव्हेंबर, २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या आधी ३ वर्षांपूर्वी म्हणजे २६ जुलै २००५ साली, आजच्याच दिवशी एका भयंकर मोठ्या पावसाने मुंबईत थैमान घातले होते.
४५० कोटींचे नुकसान आणि तब्बल १४९३ जणांचे बळी घेतलेल्या त्या दिवसाला मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. रेल्वे सेवा, बस सेवा, वीज, रस्ते सर्व काही ठप्प पडले होते, जणू काही संपूर्ण मुंबईच ठप्प पडली होती.
आजही जेव्हा मोठा पाऊस पडतो, तेव्हा मनात शंका येते की २६ जुलै सारखा पाऊस तर नाही ना पडणार? पण मंडळी तशा पावसाची बरोबरी करणारा पाऊस पुन्हा कधीही पडला नाही. आज या घटनेला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. चला तर मंडळी.. या निमित्ताने त्यावेळची काही दृष्यं बघूया. यांतून त्यावेळी काय घडलं होतं ते पुन्हा ताजं होईल....