काळ्या पैशाची माहिती द्या आणि करोडपती व्हा!!

राव, भरमसाठ बेहिशोबी संपतीला आळा घालण्यासाठी सरकारमार्फत मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जो कोणी बेहोशोबी संपतीबद्दल किंवा प्रदेशातल्या काळ्या पैशाबद्दल पुराव्यानिशी माहिती देईल त्याला ५ कोटींपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. याची घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
‘बेनामी व्यवहार माहिती बक्षीस योजना २०१८’ या योजनेतून माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्यात येणार आहे. करबुडवे आणि काळी माया साठवणाऱ्या ठगांना यामुळे चांगलाच फटका बसेल. राव, माहिती देणाऱ्यास त्याच्या माहितीनुसार बक्षीस देण्यात येईल. चला तर बघूया या बक्षीसाचं स्वरूप कसं असेल ते.


१. परदेशातील काळ्या पैशाची माहिती - ५ कोटीपर्यंत बक्षीस

स्रोत

२. बेनामी संपत्ती - १ कोटीपर्यंत बक्षीस

स्रोत
३. करबुडव्यांची माहिती - ५० लाख रुपये बक्षीस

स्रोत

राव, काळा पैशाची माहिती देऊन मला काय मिळणार या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आता !!

सबस्क्राईब करा

* indicates required