इंजिनियरने असं काय केलं की रिक्षावाल्याने त्याला फ्री मध्ये सोडलं ?

इंजिनियर्सच्या मिम आणि जोक्सचा सध्या महापूर आला आहे. फेसबुक उघडलं नाही की मिमचे ढीग पडतात आणि त्यातील अर्धे तर इंजिनियर्सवर असतात. काय हो मंडळी, इंजिनियर्स बनणं एवढं किचकट असतं का ? फक्त अभ्यासच नाही तर नोकरी लागल्या नंतरही त्यांना नीट जगता येत नाही का ?

मंडळी आज इंजिनियर्स बद्दल बोलतोय कारण नुकतीच एक घटना घडली आहे. घटना अशी की बँगलोर येथे एक सॉफ्टवेअर इंजिनियर रिक्षा चालकाशी भाड्यावरून हुज्जत घालत होता. रिक्षा चालकाने ५ किलोमीटरसाठी चक्क २०० रुपये आकारले होते. जे खरच खूप जास्त आहेत. तर, इंजिनियर आणि रिक्षाचालकाच्या भांडणात रिक्षाचालकाने सरळ इंजिनियरच्या दुखऱ्या नसवर बोट ठेवलं आणि गहजब झाला.

रिक्षाचालक म्हणाला की ‘काय साहेब, एवढं ढीगभर कमावता आणि २०० रुपयांसाठी रडता’. हे एवढे शब्द इंजिनियरचं टाळकं सटकवण्यासाठी पुरेसे होते. त्याने लगेच आपली सॅलरी स्लीप काढून रिक्षावाल्याच्या तोंडावर फेकली. रिक्षाचालकाने त्याचा पगार बघितला आणि तोंडात बोटं घातली राव.

एका इंजिनियरला महिन्याला किती पगार मिळतो याचं ते एक उत्तम उदाहरण होतं. एवढ्या कमी पगारामध्ये दिवस रात्र काम करणं म्हणजे काही सोप्प काम नाही. रिक्षाचालकाला लक्षात आलं की या बिचाऱ्याला तर माझ्याही पेक्षा कमी पैसे मिळतात. आणि मग रिक्षावाल्याला त्याही दया आली आणि त्याने त्या इंजिनियरकडून एक रुपयाही न घेता जिकडे जायचं आहे तिकडे सोडलं.

थोडं हास्यास्पद असलं तरी इंजिनियर्सचं आयुष्य दाखवण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required