computer

स्वप्नातून लागला पुनर्जन्माचा शोध! या टिकटॉक स्टारचा अनुभव एकदा वाचायलाच हवा!!

आयुष्यात बऱ्याचदा आपल्यासोबत पण कतीतरी विचित्र गोष्टी घडत असतात, पण त्यामागची नेमकी कारणे आपल्याला कळत नाहीत. स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसणं, आपल्याला कुठे तरी दुसरीकडे जायचं असत पण चुकून एखाद्या वेगळ्याच ठिकाणीच पोहोचतो, पण तिथे गेल्यावर काही तरी इतक्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडतात, की वाटतं हे आपल्या सोबतच होणार होतं का? कधीकधी अनपेक्षितपणे काही तरी चांगले फायदेही होतात तर कधीकधी तोटे.

अशीच एक गोष्ट घडली आहे, रॉबर्ट टॉल्पी या अमेरिकन टिकटॉक स्टार सोबत. रॉबर्ट हा अमेरिकेतील १९ वर्षांचा एक तरूण आहे. तो टिकटॉकसह इतर सोशल मिडियावरदेखील सक्रीय असतो. सोशल मिडिया इन्फ़्लुएन्सर म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या टिकटॉक व्हिडीओचा कंटेंट एकदम जबरदस्त आणि विनोदी असतो. इतर टिकटॉक स्टार आहेत त्यांना उद्देशूनही कधीकधी तो व्हिडीओ बनवतो. असा हा रॉबर्ट आत्ता चर्चेत आहे तो एका वेगळ्याच कारणाने ते कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल.

रॉबर्टला नेहमीच एक विचित्र स्वप्न पडत असे. या स्वप्नात तो स्वतःलाच मेलेला बघायचा. अशी स्वप्नं तर आपल्यालाही पडतात. यात नवीन काय आहे असे तुम्हालाही वाटेल, पण खरी गोष्ट तर याच्यापुढेच आहे. त्याला असे वाटायचे की त्याची त्वचा जळते आहे. ती उष्णता त्याला जाणवायची आणि तो उठून बसे तेव्हा त्याला दरदरून घाम फुटलेला असे. आणि याचवेळी त्याच्या डोक्यात एक नंबर घोळत असे. 14Z29 हा तो नंबर. असे त्याच्या बाबतीत वारंवार होऊ लागले. 

आपल्याला सारखं तेच ते स्वप्न पडण्यामागे काय कारण असावे आणि सोबत तो नंबर? हे जाणून घेण्यासाठी त्याने तो नंबर गुगल करून पहिला पण, त्याला काहीही खास माहिती मिळाली नाही. 

रॉबर्टची एक मैत्रीण आहे. जी आर्ट कॉन्झर्व्हेटर आहे. त्याने तिला या नंबरची माहिती शोधून काढण्यासाठी सांगितले. तिने या नंबरचा शोध घेतला तेव्हा तिला धक्काच बसला. कारण, तो नंबर एका पोर्ट्रेटचा टॅग होता आणि ती व्यक्ती सुमारे पाचशे वर्षापूर्वी देवीचा आजार होऊन मेली होती. खरी गोष्ट तर याच्याही पुढे आहे. पोर्ट्रेट मधील ती व्यक्ती म्हणजे रॉबर्टचा जुळा भाऊ असावा असे वाटत होते. दोघांतही भरपूर साम्य. रॉबर्ट ने जेंव्हा ते पोर्ट्रेट आणि त्याला दिलेला तो नंबर पहिला तेव्हा त्याला तर जबरदस्त धक्का बसला. 

त्याने याची माहिती देणारा व्हिडीओसुद्धा बनवला आहे. जो सध्या ट्विटरवर भरपूर ट्रेंड करत आहे.

रॉबर्टला असे वाटते की कदाचित त्याच्या मागच्या जन्मात तो देवी आजारामुळे मेला होता, याची सूचना देण्यासाठीच त्याला तशी स्वप्ने पडत होती. सध्या तरी त्याने इतकीच माहिती दिली आहे. पण, पुनर्जन्म वगैरे गोष्टी खऱ्याच अस्तित्वात असतात की या फक्त भाकडकथा असतात? तुम्हाला काय वाटते? रॉबर्ट ला तर स्वतःच्याच पुनर्जन्माचा हा शोध लागल्याने काहीसा विचित्र धक्का बसला आहे. तुम्हाला कधी अश्याप्रकार तुमच्या मागच्या जन्माचा शोध लागलाच तर तेव्हाची तुमची  प्रतिक्रिया काय असेल? तुम्हाला काय वाटते?

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required