सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांचा नवीन कोरा सिनेमा...टीझर बघून घ्या राव.

आपले महागुरू सचिनजी पिळगावकर आणि त्यांचे मानस पुत्र उर्फ मराठीतला शारूक श्री स्वप्नील जोशी यांचा नवीन चित्रपट येतोय भाऊ. चित्रपटचं नाव आहे ‘रणांगण’. तुम्हाला आठवत असेल आपल्या बालपणी स्वप्नील जोशींनी 'श्री कृष्ण' मालिकेत ‘कृष्णाची’ भूमिका केली होती. त्या मालिकेत आणि या चित्रपटात एकच साधर्म्य आहे ते म्हणजे ‘बासरी’. या चित्रपटातही स्वप्नील जोशी बासरी वाजवताना दिसत आहे.

चित्रपटाबद्दल बोलायला गेलं तर एकंदरीत या सिनेमात सचिनजी आणि स्वप्नील हे एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत आहेत. शेवटी स्वप्नीलच्या तोंडी वाक्यसुद्धा आहे, ‘आता युद्ध अटळ आहे’. कदाचित दोघांमधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. सिनेमात इतर कास्टिंगही तगडी दिसत आहे. आनंद इंगळे, सिद्धार्थ चांदेकर तसेच सुचित्रा बांदेकर, प्रणाली घोगरे अशी इतर मंडळींनी सिनेमा भरला आहे.

या पिता पुत्रांनी ‘आम्ही सातपुते’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. पण आता १० वर्षानंतर दोघेही कलाकार चांगलेच चर्चेत असताना त्यांचा हा नवा कोरा चित्रपट हिट होईल का हे पाहण्यासारखं असेल. 

चला तर आता या सिनेमाचा टीझर बघून घ्या राव...

सबस्क्राईब करा

* indicates required