चला भेटूया रेल्वे उद्घोषणांमागचा अटॉमेटेड आवाज काढणाऱ्या श्रावण अदोडेना

प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या!! या शब्दांमागील आवाज आपल्या इतक्या ओळखीचा झाला आहे की, कोणी अर्ध्या रात्री हा आवाज ऐकवला तरी आपण रेल्वे स्टेशनवर असल्याचा भास होईल. रेल्वे स्टेशनवर नेहमी ऐकू येणारा हा आवाज बरेचदा रेकॉर्डेड असतो हे सगळ्यांना माहीत आहे.

हा घोषणा करणारा आवाज एका महिलेचा असतो हे कुणीही सांगू शकेल. तुम्ही कधी परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर गेलात तर तिथे सेम हाच आवाज ऐकू येईल. फरक इतकाच की हा आवाज रेकॉर्डेड नसेल आणि त्याहूनही विशेष म्हणजे हे बोलणारी कुणी महिला नसेल.

श्रावण अदोडे हे अगदी हुबेहुब तसाच आवाज काढून दाखवतात जसा आवाज आपण रेल्वे स्टेशनवर ऐकतो. श्रावण रेल्वेत क्रू मॅनेजमेंटमध्ये कामाला आहेत. स्टेशनवर जेव्हा लाईट नसते किंवा इतर अडचणी येतात तेव्हा श्रावण आपले हे कौशल्य अजमावतात. ते घोषणा करतात तेव्हा हा आवाज नेहमी बोलणाऱ्या बाईचाच आहे हे तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.

 

श्रावण याना या आवाजाचे नेहमीच कुतूहल वाटत असे. मग काय हौस म्हणून त्यानी हुबेहूब तसाच आवाज काढायचा सराव केला. त्याचा थेट फायदा त्यांना झाला. रेल्वे स्टेशनवर काहीही अडचण आली तरी श्रावण आपल्या आवाजाने प्रवाशांना सूचना करतात. याच आवाजामुळे कधीकाळी श्रावण याना अपमानित व्हावे लागायचे, त्यांची थट्टा केली जात असे.

आज मात्र हा आवाज त्यांना सर्वत्र ओळख मिळवून देत आहे. श्रावण यांची विशेषता म्हणजे फक्त हिंदीत नाही, तर तब्बल १४ भाषांमध्ये ते स्टेशनवरील घोषणा करु शकतात. श्रावण यांनी जोपासलेली ही आगळीवेगळी कला निश्चितच कौतुकास्पद म्हणावी अशी आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required