computer

पगडीचा थाट...पगडीवरून चिडवले म्हणून त्याने पगडीच्या रंगाच्या १५ रोल्स रॉयस घेतल्या!!

आपल्याकडे स्वतःची एक कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक जास्त श्रीमंत झाले की त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कार दिसायला लागतात. पण आज आम्ही युकेत बिजनेसमॅन असलेल्या एका शीख बंधूबद्दल सांगणार आहोत, त्यांच्याकडे जितक्या रंगाच्या पगड्या आहेत, तितक्या रंगाच्या रोल्स रॉयस कार आहेत. ज्यादिवशी ज्या रंगाची पगडी घातली त्याच रंगाची रोल्स रॉयस घेऊन ते बाहेर पडतात.

तुम्ही आजवर काही सेलेब्रिटींचे मॅचिंग बूट, कपडे, पर्स असे शौक बघितले असतील, या पठ्ठ्यासमोर त्यांचे शौक म्हणजे अतिसामान्यच! रौबेन सिंग असे त्यांचे नाव आहे. कार आणि पगडीचा रंग असे मॅचिंग फोटो वायरल झाल्यावर जगभर त्याचे नाव पोहोचले आहे.

रौबेन सिंग यांची युकेत ऑलडेपीए नावाची कंपनी आहे. त्यांनी असे करण्यामागे पण कारण आहे. त्यांना युकेत पगडी घालण्यावरून एकाने हिणवले. भावाने तिथेच ठरवले, यांच्या नाकावर टिच्चून जितक्या रंगाच्या पगड्या तितक्या रंगाच्या रोल्स रॉयस विकत घेऊन दाखवीन आणि खरोखर तसे करून दाखवले.

एक दोन नाही, तर तब्बल १५ पेक्षा अधिक रोल्स रॉयस त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या घरातील पार्किंग ही एखाद्या रोल्स रॉयसच्या शोरूमला शोभावी अशी आहे. रोल्स रॉयसव्यतिरिक्त पण त्यांच्याकडे आणखीही कार्स आहेत. त्यात पोर्शा, बुगाटी, लँबोर्गीनी, फेरारी अशा सर्वच टॉप ब्रँडसच्या कार आहेत. या सर्व कार्सची किंमत ही काही कोटींच्या घरात आहे.

रौबेन सिंग हे काही वडिलोपार्जित संपत्तीचे मालक नाहीत. १९९५ साली वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू करत एवढी संपत्ती त्यांनी जमा केली आहे. रौबेन सिंग यांच्याकडे पाहुन खरोखर 'नाद केला पण वाया नाही गेला' असे म्हणता येईल.

रोल्स रॉयस विकत दिली नाही म्हणून रोल्स रॉयसची कचरागाडी करणाऱ्या भारतीय राजाची गोष्ट माहित असेल, पण या आधुनिक पगडीवाल्या राजाची गोष्टही तितकीच रोचक आहे!!

वाचा रोल्स रॉईसचा 'घंटा गाडी' म्हणून वापर करणाऱ्या महाराजांविषयी !!!

सबस्क्राईब करा

* indicates required