मरणाच्या २ महिन्या नंतर सुद्धा हसतोय हा साधू...काय आहे हा थायलंड मधला अजब प्रकार ?

थायलंड मध्ये एका परंपरेनुसार बौद्ध भिकुंना मरणानंतर २ महिन्यांनी बाहेर काढलं जातं. यानंतर मृतदेहाला मंदिरात ठेवून प्रार्थना केली जाते. जो पर्यंत मृत्यू होऊन १०० दिवस पूर्ण होत नाहीत तो पर्यंत हा मृतदेह मंदिरात ठेवण्यात येतो. १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मृतदेह साफ करून त्याला नवीन कपडे घातले जातात. हा त्यांच्या पृथ्वू वरचा शेवटचा दिवस मानला जातो.

थायलंड मध्ये असाच एक कार्यक्रम नुकताच पार पडला.‘लुआंग फोर पियान’ या बौद्ध भिकुंच्या मृत्यु नंतर त्यांना २ महिन्यांनी बाहेर काढण्यात आलं. त्याचं ९२ व्या वर्षी निधन झालं होतं. जेव्हा त्यांच्या मृतदेहाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा लोकांनी जे बघितलं ते आजवर कोणीही बघितलं नव्हतं. लुआंग फोर पियान यांचा मृतदेह २ महिन्यानंतरही जसाच्या तसाच होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं स्मित सुद्धा तसच टिकून होतं.

स्रोत

साधारणपणे मृत्यू नंतर १ महिन्याच्या आतच शरीर कुजण्यास सुरुवात झालेली असते. ही प्रक्रिया मरणानंतर काही तासांनीच सुरु होते. पण लुआंग फोर पियान यांच्या बाबतीत असं झालेलं दिसत नाही. हे एक आश्चर्यच म्हणव लागेल. त्याचं स्मित आणि निद्रेत असलेला चेहरा बघून काही बौद्ध भिकुंनी असं सांगितलं की अध्यात्मिक दृष्ट्या त्यांना संपूर्ण शांती म्हणजे मोक्ष मिळाला आहे. पण मानवी शरीर शास्त्राच्या दृष्टीने हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required