स्नॅपचॅटने भारताला गरीब म्हटलं... आता फजिती झाली ना भाऊ!!

लोकप्रिय सोशल नेटवर्किंग अॅप स्नॅपचॅटचे सिईओ इवान स्पिगल. या महाशयांना आपल्या भारतवर्षाचा महिमा नक्कीच माहीत नसावा. म्हणूनच कदाचित यांनी भारताला गरिब संबोधून भलतीच आपत्ती ओढवून घेतली आहे.

        २०१५ मध्ये 'ग्रोथ अॉफ अॅप्स युझर बेस' नावाच्या एका बैठकीत इवान स्पिगल यांनी "स्नॅपचॅट हे फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. भारत आणि स्पेन सारख्या गरिब देशात मला ते वाढवण्याची इच्छा नाही." असं वादग्रस्त विधान केलं होतं. (हे बोलायला हवंच होतं का?). त्यामुळं देशभरातील लोकांनी आता स्नॅपचॅटवर राग काढायला सुरुवात केलीय. हजारो लोकांनी हे अॅप आपल्या स्मार्टफोन मधून अनइन्स्टॉल केलंय. सोबत प्ले-स्टोअरवर या अॅपला निगेटिव्ह रेटींग्जही दिल्या जात आहेत.

ट्विटर वर #UninstallSnapchat आणि #BoycottSnapchat हे हॅशटॅग सद्या जोरात ट्रेंड करत आहेत. मात्र स्नॅपचॅटकडून आपण असं काहीही बोललो नसल्याचं सांगण्यात येतंय. हद्द म्हणजे बर्‍याच लोकांनी नावातल्या सारखेपणामुळं चक्क स्नॅपडील अॅपही अनइन्स्टॉल केलंय. एकंदरीत भारतीय सोशल मिडीयावर सद्या स्नॅपचॅट विरोधी वातावरण आहे.

स्नॅपचॅटच्या रेटींग्ज घसरल्या 


​​​​

ट्विटरवरही स्नॅपचॅटला ट्रोल केलं जातंय..

सद्या भारतात स्नॅपचॅटचे ४० लाख वापरकर्ते आहेत. त्यामुळे या सगळ्याचा फटका स्नॅपचॅटच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला बसू शकतो. कारण शेवटी तुम्ही भारतीयांना डिवचलंय राव !

सबस्क्राईब करा

* indicates required