अमेरिकेतल्या न्यूजर्सीत चक्क गोवऱ्या विकल्या जात आहेत...किंमत पाहून घ्या !!

हल्ली अस्सल भारतीय उत्पादनं चकाचक मॉल्समध्ये विकली जात आहेत. काही वर्षापूर्वी एकाने भारतीय खाट चक्क ९९० डॉलर्सला बाजारात आणली होती. प्रदूषण रोखण्यासाठी भारतीय पत्रावळी पण इकोफ्रेंडली नाव घेऊन बाजारात आल्या आहेत. अशा पत्रावळ्या आजही अमेझॉनवर मिळतात.
तर, आज विषय असा आहे की खाट आणि पत्रावळ्यांच्या घवघवीत यशानंतर आता चक्क गोवऱ्या बाजारात आल्या आहेत. ते पण भारतात नाही, चक्क अमेरिकेत!! हा फोटो पाहा.
My cousin sent me this. Available at a grocery store in Edison, New Jersey. $2.99 only.
— Samar Halarnkar (@samar11) November 18, 2019
My question: Are these imported from desi cows or are they from Yankee cows? pic.twitter.com/uJm8ffoKX2
हा फोटो न्यूजर्सी येथील किराणा मालाच्या दुकानातला आहे. भारतीयांना गोवऱ्या कशासाठी वापरतात हे माहित असतं, पण अमेरिकन लोकांना हे माहित असण्याची शक्यताच नाही. म्हणूनच लेबलवर “religious purposes” आणि “Not Eatable” लिहिण्यात आलंय. फोटोच्या तळाशी किंमत दिलेली आहे. या गोवऱ्या २.९९ डॉलर्सला म्हणजे २१४ रुपयांना विकल्या जात आहेत.
गोवऱ्या चक्क अमेरिकत काय करतायत? त्याचं असंय मंडळी, अमेरिकेत भारतीय मोठ्याप्रमाणात आहेत. तिथे ते भारतीय पद्धतीनेच पूजा विधी करतात. ते म्हणतात मागणी तसा पुरवठा. अमेरिकेतल्या भारतीयांची मागणी ओळखूनच गोवऱ्या बाजारात आणण्यात आल्या आहेत. या उत्पादनावरच्या ‘सब्जी मंडी’ अक्षरांवरून हे काम भारतीयांनीच केलेलं दिसतय.
तर मंडळी, भारतात प्रत्येक गावात घरोघरी दिसणाऱ्या गोवऱ्या आता चक्क अमेरिकेत पोचल्या आहेत. काय म्हणाल या नवीन कल्पनेबद्दल ?