काय आहे आईन्स्टाईन तात्याच्या 'या' फोटो मागील कहाणी...वाचा की राव !!

ग्रेट, महान, ज्ञानी, महाज्ञानी, जीनियस, लेजंड श्री श्री श्री आईन्स्टाईन तात्या यांच्याबद्दल आज गुगल करताना मी एक फोटो बघितला. या फोटोत तात्यांनी चक्क जीभ बाहेर काढलीये भौ!! मला वाटलं हा फोटो कोणत्यातरी येडचाप माणसानं फोटोशॉप करून लावलाय, पण गुगल करून बघितल्यावर समजलं की हा फोटो तर एकदम असली हाय. मग अजून गुगलून बघितल्यावर जे कळलं ते तुम्हाला सांगतो.

स्रोत

दिवस होता तात्यांच्या ७२ व्या हैप्पी बड्डेचा! १४ मार्च, १९५१! प्रिन्सटन यूनिवर्सिटीमध्ये सगळे धुमधडाक्यात बड्डे सेलिब्रेट करत होते. सगळे पत्रकार, मिडीयावाले तिथे जमा झाले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर तात्या एका मित्राच्या कारमधून घरी जायला निघाले. कार्यक्रम संपल्यानंतरपण या मिडीयावाल्यांनी तात्यांची पाठ सोडली नाही. त्यातला एक फोटोग्राफर होता ‘आर्थर सेस्से’.

सारखं सारखं स्माईल देऊन  तात्यांना आधीच आलेला कंटाळा, त्यात हा आर्थर भाऊ आला आणि फोटो काढू लागला. आता वैतागलेल्या तात्यांनी त्याला स्माईल देण्याऐवजी सरळ जीभ काढून दाखवली अन नेमका त्याच वेळी फोटो खेचला गेला.

स्रोत

पण आईन्स्टाईन तो नाम ही काफी हे बॉस!! तो फोटो तात्यांनासुद्धा आवडला. त्यांनी फक्त आपला तेवढा फोटो कापून घेतला आणि त्याच्या ९ कॉपी मागवून घेतल्या. त्यातल्या एकावर त्यांनी सही केली अन तो वर्जीनल सही केलेला फोटो २००९ मध्ये १,२५,००० हजारला विकला गेला.

स्रोत

जगात आईन्स्टाईन तात्यांच्या दोनच गोष्टी फेमस हायत. एक तर त्यांचे घरट्यासारखे केस अन दुसरं म्हंजी हा फोटो !!

सबस्क्राईब करा

* indicates required