computer

१९७८ च्या नोटबंदीत इतिहास जमा झालेल्या १०,००० च्या नोटेबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

आजचा दिवस नोटांच्या 'रद्दी'करणाचा दिवस म्हणून आणखी बरीच वर्षे जनमानसात लक्षात राहील. हे काही पहिले निश्चनिलीकरण नव्हते.

वर दिलेली १०००० रुपयांची नोट बघा. भारतीय इतिहासात पहिल्यांदा १९३८ साली आलेली ही नोट १९४६ साली रद्द करण्यात आली होती. सोबत १००० आणि ५००० रुपयांच्या नोटासुध्दा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यांनतर १९५४ साली या नोटा पुन्हा चलनात आणल्या गेल्या.

१९७८ साली झालेल्या नोटबंदीनंतर पुन्हा एकदा १०,००० ची नोट बाजारातून हद्दपार झाली. १९७८ साली ‘हाय डेमिनिनेशन बँक नोट्स (डेमोनेटाइझेशन) अॅक्ट, 1978’ आणण्यात आला होता. हा कायदा १९४६ च्या  निश्चनिलीकरणावेळच्या नियमांवर आधारलेला होता. या कायद्याच्या अंतर्गत उच्च मुल्यांकन असलेल्या नोटा बंद करण्यात आल्या. या नोटबंदीच्या लाटेत १००० आणि ५००० च्या नोटेसोबत १०,००० ची नोट पण चलनातून बाद करण्यात आली.

असं म्हणतात की १०,००० च्या फारच कमी नोटा छापण्यात आल्या होत्या. कमी म्हणजे जवळजवळ ३४६. यापैकी केवळ १० नोटा आज उपलब्ध आहेत. २०१६ साली आलेल्या एका बातमीनुसार या १० पैकी एक नोट दुबईच्या रामकुमार या व्यावसायिकाकडे आहे. त्यावेळी ही नोट प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

रामकुमार यांना नोटेची किंमत विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ‘या दुर्मिळ नोटेची किंमत ठरवणं कठीण आहे.’

५०-६० च्या दशकात जेव्हा माणसांना महिन्याला पगार म्हणून केवळ १० रुपये मिळायचे त्याकाळात तब्बल १०,००० रुपयांची नोट अस्तित्वात होती हेच आश्चर्य आहे. ही नोट त्यावेळी पण सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हती आणि आता जर विक्रीस आली तर तिची एवढी मोठी बोली लागेल की सामान्य माणसाला ती पाहताही येणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required