computer

बोभाटाच्या 'जय हो!' या नव्या लेखमालिकेत काय वाचाल ?

जगात असं काहीच नाही जे शंभर टक्के फूल प्रूफ आहे आणि कधीच अपयशी होणार नाही.
ते एखादं यंत्र असो,एखादा निर्णय असो,की साधा आडाखा !
कोणतीही कल्पना राबवताना त्यातील खाच खळगे शोधून त्यावर उपाय शोधणं अनिवार्य असतं.
तरी देखील नजरचुकीने म्हणा,की उणे बाजूकडे दुर्लक्ष झाल्यामुळे,अशा काही समस्या उद्भवतात की संपूर्ण योजना किंवा एखादी क्रांतिकारी नवकल्पना देखील अपयशी ठरू शकते.
अर्थात अपयशावर लक्ष केंद्रित करून यश मिळवणे तसे दुरापास्तच;त्यापेक्षा अपयशाच्या सकारात्मक पैलूंचे परीक्षण करून अधिक नव्या मार्गाने पुढे जात रहाणे अधिक श्रेयस्कर असते. 
कोणत्याही व्यक्तीचे किंवा व्यवसायाचे प्रयत्न कां फोल ठरले आणि या चुकांमधून आपण काय शिकलो याचे परीक्षण केल्यामुळे भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने यशस्वी झालेल्या काही व्यक्ती आपल्याला दिसतील. अशाच काही व्यक्तींबद्दल आणि व्यवसायांबद्दल आपण जाणून घेणार आहोत बोभाटाच्या 'जय हो!'  ह्या नव्या लेखमालिकेतून !
हे लेख वाचून तुम्हाला कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेतील एक ओळ नक्कीच आठवेल.
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

सबस्क्राईब करा

* indicates required