computer

सुला वाईनयार्डच्या समभागासाठी अर्ज करावा का ?

दारु पिणार्‍या माणसाला आपण दारुडा किंवा बेवडा असे लेबल लावतो  पण अगदी 'सहकुटुंब सहपरिवार' वाईन पिणार्‍यांना आपण रसिक म्हणतो. आपली समाजव्यवस्था आणि समज बदलतो आहे याचे हे एक उदाहरण आहे. पण  आपल्या लेखाचा आजचा विषय मदिरेच्या आसक्तीबद्दल नाही तर सुला वाईन्स या कंपनीचा पब्लीक इश्यू येतो आहे त्याबद्दल आहे.या आयपीओमध्ये आपण अर्ज टाकायचा किंवा नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आम्ही फक्त या इश्यूची सकारारात्मक आणि नकारात्मक बाजू दाखवणार आहोत.निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचे मत घेणे आवश्यक आहे हे वेगळे सांगायला नको.

१ दारू बनवणार्‍या अनेक कंपन्या बाजारात नोंदणीकृत आहेत. उदाहरणार्थ, जी एम ब्रुअरीज !  परंतू वाईन क्षेत्रातील शेअर बाजारात नोंदणीकृत सुला वाईन ही एकच कंपनी असणार आहे.

२ मार्च २०२२ या वर्षअखेरीस सुला वाईन्सचे नफ्याचे प्रमाण म्हणजे प्रॉफीट मार्जीन सर्वात अधिक आहे. हे प्रमाण येत्या काळात टिकून राहते अथवा नाही यावर गुंतवणूकदाराने लक्ष ठवायला हवे.

३ सर्वसाधारण जनतेचे वाढणारे उत्पन्न आणि शहरीकरण या दोन गोष्टी वाईनचा खप वाढवणार आहेत असे समजले जाते.

४ नोंदणी झालेल्या दारु बनवणार्‍या कंपन्यांशी तुलना केली तर सुला वाईन्सचा Price–Earnings ratio म्हणजे समभागाचा भाव आणि प्रत्येक समभागामागे मिळणारे उत्पन्न यांचे गुणोत्तर सर्वात अधिक आहे. 

५ आता सर्वात महत्वाचा मुद्दा : गेल्या आर्थिक वर्षात सर्वात जास्त नफ्याचे प्रमाण दाखवल्यावर तातडीने पब्लिक इश्यू बाजारात घेऊन येणे ही थोडीशी शंकेची बाब आहे असे बाजाराचे मत आहे. या इश्यूच्या माध्यमातून जमा होणारा पैसा कंपनीच्या कामकाजासाठी वापरला जाणार नाही. हे पैसे सुरुवातीला ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांना गुंतवणूकीतून बाहेर पडण्यासाठी वापरला जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी ही महत्वाची बाब डोक्यात ठेवूनच अर्ज करावा असे तज्ञांचे मत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required