भगत सिंग, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक यांचे जिवंत फोटो पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही !!

कधी कधी एखादा फोटो बघताना तो किती जिवंत वाटतो. असं वाटतं अगदी आत्ता त्या फोटोतील व्यक्ती आपल्याशी बोलू लागतील. समजा एखाद्या फोटोतील मृत झालेल्या व्यक्ती खरंच हालचाल करून बोलू लागली तर? भुताटकी वाटेल ना!. पण हे खरंच झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने हे शक्य करून दाखवलं आहे. स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, लोकमान्य टिळक, कस्तुरबा गांधी आणि स्वामी विवेकानंद आणि महान गुरु आणि शिक्षक अरबिंदो यांचे हलते फोटो पाहून तुम्हीही चकित झाल्याशिवाय राहणार नाही.

लेखक आणि ट्विटर युझर कार्तिक शशिधरन यांनी ट्विट करून या फोटोंना लोकांसमोर आणलं आहे. हे फोटो Artificial intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच वापर करून तयार करण्यात आले आहेत. यातला पहिला फोटो हा आपल्या सगळ्यांचा अत्यंत जवळचा फोटो आहे. 

कार्तिक शशिधरन यांनी भगतसिंगांचा हलता फोटो पोस्ट करून म्हटलं आहे की, "वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी ब्रिटिशांनी या क्रांतिकारला फासावर लटकवून यांचा आवाज कायमचा बंद केला. पण त्यांनी दिलेली प्रेरणा अजूनही मनामनात जिवंत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला तोच अनुभव येईल."

त्यानंतरच्या ट्विटमध्ये स्वामी विवेकानंदांचा हलता फोटो पोस्ट करून कार्तिक शशिधरन म्हणाले, “स्वामी विवेकानंद असे फोटो पाहून नक्कीच हसले असते. पण हे छायाचित्र AI अल्गोरिथमच्या प्रयत्नांमुळे परत जिवंत झाले असे वाटेल."

तरुण कस्तुरबा गांधी यांचाही फोटो त्यांनी पोस्ट केला व म्हणाले, "त्याकाळी उच्च प्रतीचे फोटो काढणे शक्य नव्हते पण हा फोटो कदाचित दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी काढला असावा. त्या आपल्या मुलांना सांभाळत गांधीजींच्या मागे ठाम उभ्या राहिल्या. त्यांचेही योगदान खूप मोठे आहे."

कार्तिक शशिधरन यांनी लोकमान्य टिळकांचाही फोटो शेअर केला आहे. फोटोबद्दल बोलताना ते म्हणतात की लोकमान्य टिळकांचा चांगला फोटो शोधणं कठीण काम होतं. काहीही म्हणा पण कार्तिक शशिधरन यांनी अत्यंत प्रयत्नाने शोधेलेला हा फोटो जिवंत वाटतो यात शंका नाही.

सगळ्यात शेवटी त्यांनी महान शिक्षक आणि क्रांतिकारक अरबिंदो यांचा फोटो पोस्ट करून लिहिले, "जेव्हा ते तरुण होते तेव्हा त्यांचं क्रांतिकारक मन खूप अस्वस्थ होतं. भारतमातेसाठी ते शेवटपर्यंत लढले. आपले तन मन त्यांनी मायभूमीसाठी अर्पण केले, त्यांचा फोटो पाहून ते काही सांगत आहेत असे वाटेल."

नेटिझन्समध्ये हे चारही फोटो खूप व्हायरल झाले आहेत. आपल्या मनामध्ये ज्यांच्याविषयी खूप आदर आहेत ते फोटो जणूकाही पुनरुज्जीवित झाल्यासारखे दिसतात. या फोटोंचे नेटिझन्सने खूप कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) हे नवीन तंत्रज्ञान भविष्यात कामाच्या खूप मोठ्या संधी निर्माण करतील. यात सतत नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील असे वाटते..

तुम्हाला कोणता फोटो  खरोखर जिवंत आहे असं वाटतय. कमेंट करून नक्की सांगा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required