रुपेरी वाळूत माडांच्या बनात चार दिवस - 'स्वर-निसर्ग'

दिवाळीची सुट्टी म्हणजे एक अवघड गणित असतंय बघा ! आधीचे चार दिवस दिवाळीच्या सणात जातात. खिसा बर्‍यापैकी हलका झालेला असतो. उरलेली रजा शाळेच्या मर्जीनुसार असते. मुलं केंद्रीय विद्यालयात असतील तर जेमतेम चार दिवस शिल्लक रहातात, ज्या शाळा डिसेंबरला नाताळाची रजा देतात त्या शाळा दिवाळीच्या रजेत कपात करतात. मुलं नववी, दहावीत असतील तर विचारायला नकोच कारण क्लासवाले त्यांचा अभ्यासक्रम उरकण्याच्या खटपटीत सुट्टी संपवून टाकतात. मग हातात उरलं काय ? चार पाच दिवसाची सुट्टी आणि छोटंसं बजेट !

पण मन म्हणत असतं -जरा एकांत दे - पोराबाळांबरोबर चार दिवस हक्काचे दे - थकलेलं शरीर म्हणत असतं -जरा आराम करू दे- बायको म्हणत असते -अहो चार दिवस तरी किचनच्या बाहेर घेऊन जा हो मला -मुलं म्हणतात- बाबा, चार दिवस धमाल करू द्या, नंतर आहेच अभ्यास आणि क्लास !!!

या सगळ्या मागण्या एकाच पॅकेज मध्ये बसवायच्या असतील तर एक उत्तम पर्याय आज आम्ही तुमच्या समोर ठेवतो आहोत. बोभाटाच्या मित्र परिवारातील अविनाश नाईक यांचे दोन एकरात वसलेले हॉलीडे होम "स्वर-निसर्ग ". 

अहोरात्र कानावर पडणारी समुद्राचे स्वरगान आणि माडांच्या बनात वसलेला स्वर्ग - स्वर निसर्ग !

कुठे आहे ? किती दूर आहे ? वास्तव्याची सोय कशी आहे ? प्रायव्हसी आहे का ? समुद्र किती दूर आहे ? जवळपास काही बघण्यासारखं आहे का ? जेवणाचं काय ? 

अरे , हो किती प्रश्न ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो , जरा धीर धरा !!!

कुठे आहे ? किती दूर आहे ? : अलीबागजवळ "चौल" येथे, मुंबई पासून ११० किमी आणि पुण्यापासून १५० किमी.

जायचं कसं ? : स्वतः ड्राइव्ह केलं तर दोन अडीच तास लागतात, पुण्याहून आलात तर तासभर जास्त लागेल. 

वास्तव्याची सोय कशी आहे ? प्रायव्हसी आहे का ? : निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत ,माडांच्या बनात, शॅक स्टाइलच्या छोट्या छोट्या कॉटेजेस ! एका कॉटेजमध्ये  एक मोठी बेडरूम -त्याला जोडून बाथरुम, समोर व्हरांडा अशी रचना आहे. बेडरुम मध्ये एक्स्ट्रा बेड टाकले तर संपूर्ण कुटुंबाची व्यवस्था होऊ शकते. 

जेवणाचं काय ? : अमर्यादीत शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पध्दतीचे जेवण आणि नाश्ता हा पॅकेजमध्येच आहे. आणि खरं सांगायचं तर मासळी ज्यांना आवडते त्यांच्या साठी ही पर्वणीच आहे. ताज्या पापलेट सुरमई जिताडं , कोळंबी  मासळीचे जेवण ही तर स्वर निसर्गची खासियत आहे . मटण आणि चिकन हवं असेल तर तेही मिळेलच.

समुद्र किती दूर आहे ? बीच किती आहेत ? : चौल पासून अनेक सुंदर समुद्र किनारे जवळ आहेत. रेवदंडा -१.५ किमी, नागाव फक्त ३ किमी आणि काशिद -१० किमी अंतरावर आहेत.

या खेरीज बिर्ला मंदीर -शितळामातेचे मंदीर- डोंगरावरचे दत्त मंदीर या  प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या. आणि हो, स्वर-निसर्गची आणखी एक खासियत अशी आहे की दरवर्षी अविनाश नाईक आणि त्यांची मित्रमंडळी 'म्युझिकल टुरीझम'चा कार्यक्रम आयोजीत करतात . स्वर-निसर्गच्या प्रांगणात संगीताचा एक कार्यक्रम आयोजीत केला जातो. त्याची झलक खाली दिलेल्या लिंकमध्ये तुम्हाला बघता येईल.

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बजेटचे काय ? तर   माणशी २२५० (१ ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना कोणतंही शुल्क नाही. ६ ते १० वर्षापर्यंतच्या मुलांना ५०% शुल्क. १० पेक्षा जास्त वयोगटातील मुलांना पूर्ण शुल्क लागू) मध्ये वास्तव्य + दोन लंच/डिनर व्हेज/नॉनव्हेज अनलिमिटेड + १ नाश्ता. आणखी माहितीसाठी आणि आगाऊ नोंदणीसाठी फोन करा - श्री अविनाश नाईक-8805425234

सबस्क्राईब करा

* indicates required