computer

लष्कर दिनाच्या दिवशी या भारतीय महिला अधिकाऱ्याने कोणता नवीन इतिहास रचला?

सैन्याधिकारी तानिया शेरगिल यांनी काल नवीन इतिहास घडवला आहे. १५ जानेवारी भारतीय लष्कर दिनाच्या निमित्ताने झालेल्या संचलनात त्यांनी पुरुष तुकडीचं नेतृत्व केलं. लष्कर दिनाच्या दिवशी एका महिलेने पुरुष तुकडीचं नेतृत्व करण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ होती.

कोण आहेत तानिया शेरगिल ?

तानिया शेरगिल यांनी इलेक्ट्रोनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवली आहे. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी मधून त्या सैन्यात दाखल झाल्या. त्यांच्या कुटुंबात सैन्यात जाण्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे वडील १०१ मिडीयम रेजिमेंटमध्ये (तोफखाना विभाग) होते, तर आई  १४ व्या आर्मर्ड रेजिमेंटमध्ये होत्या. त्यांचे आजोबा हे शीख रेजिमेंटमध्ये होते.

(भावना कस्तुरी)

महिला अधिकाऱ्यांवर अशाप्रकारची महत्वाची जबाबदारी देणे हे फारच कमी वेळा घडतं. याची खरी सुरुवात ही २००६ साली वाहिदा प्रिझम शेख यांच्यापासून झाली. वार्षिक संचलनात पुरुष तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला होता. त्यानंतर २०१९ साली भावना कस्तुरी यांनी असाच नवीन पायंडा घालून दिला होता. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने झालेल्या संचलनात पुरुष तुकडीचं नेतृत्व केलं होतं.

भारतीय लष्कर आणि महिला

(वाहिदा प्रिझम शेख)

भारतीय सैन्यात आता जास्तीत जास्त महिलांना सामावून घेतलं जात आहे. त्यांना पुरुषांप्रमाणेचं ६१ आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. येत्या १७ वर्षांच्या काळात प्रत्येक वर्षी १०० महिलांना सैन्यात दाखल करून घेण्यात येणार आहे. २०२१ च्या मार्च पर्यंत १०० महिलांची नियुक्ती केली जाईल. त्यांना लष्करी पोलिस दल आणि भारतीय लष्करात दाखल केलं जाईल. लष्करी पोलीस दलात १७०० महिला पोलीस असतील असा विचार करून हे पाऊल उचलण्यात आलंय.

एक चांगली गोष्ट म्हणजे आजवर महिलांना फक्त अधिकारी म्हणून निवड व्हायची, पण काळात पहिल्यांदाच महिलांचा सैनिकांच्या रॅंकमध्ये समावेश केला जाईल.

तर, अशाप्रकारे २०२० चा लष्कर दिन हा महिलांसाठी नवीन उर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला.

 

आणखी वाचा :

स्त्रियांना या ७ गोष्टी करण्याची परवानगी नव्हती!! काही परवानग्या तर गेल्या १० वर्षांत मिळाल्या आहेत..

सबस्क्राईब करा

* indicates required