१००० रुपयांना एक कप चहा?? फाईव्ह स्टार हॉटेल नाही तर या जागी मिळतोय हा चहा !!

फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या चहाच्या किंमतीची नेहमी चर्चा होत असते. पण जर तुम्हाला असे सांगितले की एका टपरीवर हजार रुपयांचा चहा मिळतो? डोळे विस्फारले ना वाचून? ही गोष्ट ना खोटी आहे, ना यात काही अतिशयोक्ती आहे.
ही गोष्ट आहे पश्चिम बंगालची!! बंगालमधल्या पार्थप्रतिम गांगुली यांनी आपली चांगली नोकरी सोडली आणि त्यांनी चहा विकायचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या चहाच्या दुकानात एक दोन नाही,तर ११५ प्रकारचे चहा मिळतात. जपानच्या सिल्व्हर निडल व्हाइट टी पासून आफ्रिकी कॅरमल, नायजेरियन रेड वाईन चहा, ऑस्ट्रेलियन लँवेंडरपर्यन्त सर्व प्रकारचा चहा इथे मिळतो.
(सिल्व्हर निडल व्हाइट टी)
दर कपामागे एवढी किंमत ठेवण्यामागे कारण पण तसेच आहे. सिल्व्हर नीडल व्हाइट टी हा २,८०,००० रुपये किलो प्रमाणे बाजारात मिळतो, तर कॅमोमाईल टी ची किंमत १४,००० रुपये किलो आहे. पार्थप्रतिम गांगुली म्हणतात की हजारपैकी १०० लोक माझ्या दुकानावर येतात. पण जे येतात ते पूर्ण जगाला माझ्या चहाचा करिष्मा सांगतात.
परिसरात पार्थबाबू म्हणून प्रसिध्द असलेला पार्थप्रतिम यांनी चहाची किंमत जास्त ठेवण्यामागे असलेले कारण लोकांना माहीत असल्याने किमतीबद्दल कुणी तक्रार करत नाही. उलट आवडीने लोक चहा प्यायला येतात. वर सांगितलेल्या चहाचा प्रकार लोकांना घरच्या घरी करता यावा यासाठी ते सुटा चहा देखील विकत असतात.
(रेड वाईन चहा)
आपल्या आजूबाजूला अनेक चहाची दुकाने असतील, पण पार्थप्रतिम यांच्या उदाहरणावरून एक गोष्ट कळते ती ही की जर आपण एखादा सर्व साधारण व्यवसाय जरी नाविन्यपूर्ण पद्धतीने केला तर आपला व्यवसाय वाढायला वेळ लागणार नाही.
(सर्व फोटो प्रातिनिधिक)