computer

मुलांना हात धुण्याचं महत्त्व शिकवण्यासाठी शिक्षिकेने काय कल्पना शोधली पाहा...

कोरोनाव्हायरसचे थैमान घातल्यापासून मोठ्यांना हात धुण्याचं महत्त्व जास्त ठळकपणे समजलेलं आहे. पण  छोट्यांना हात धुण्याचं महत्त्व शिकवणं तसं अजूनही कठीणच आहे. म्हणून मायामीच्या शाळेतील शिक्षिकेने एक आगळीवेगळी शक्कल लढवली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. तुम्ही नसेल पाहिला तर लगेच पाहून घ्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amanda Lorenzo (@mandysmunchkins_) on

लहान मुलांना जंतू, विषाणू यांच्याबद्दल सांगितल्यास ते त्यांना कितपत समजेल हा प्रश्नच आहे. म्हणून मायामीच्या अमांडा लॉरेन्झो या शिक्षिकेने शोधून काढलेली ही आयडियाची कल्पना जास्त सोप्पी वाटते.  तिने काय केलं ते समजून घेऊया.

व्हिडीओच्या सुरुवातीला दिसणारी घाणेरडी  बशी ही घाणेरडी नसून त्यात काळी मिरी आहे. तिने आधी मुलाला घाणेरड्या बशीत बोट बुडवायला सांगितलं. त्यानंतर तेच बोट साबण असलेल्या बशीत बुडवायला सांगितलं. त्यानंतर ते बोट पुन्हा घाणेरड्या बशीत बुडवायला सांगितलं. आता रासायनिक क्रियेने साबणामुळे काळी मिरी मागे सरली.

कोणत्याही लहान मुलांना हे पाहून हात धुण्याचं महत्त्व समजलं नाही तरंच नवल. व्हिडीओमध्ये प्रयोग सफल झाल्याचं दिसूनही येत आहे.

अमांडा लॉरेन्झो हिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो लगेचच व्हायरल झाला. आतापर्यंत ४ लाख पेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ? हा प्रयोग तुम्ही तुमच्या मुलांना दाखवणार का?

सबस्क्राईब करा

* indicates required