वंदे मातरम् २०१९ : २६ मराठी कलाकार आणि २६ स्वातंत्र्यसैनिकांनी सजलेली दिनदर्शिका !!

मंडळी, यावर्षी तेजस नेरुरकर या फोटोग्राफरने २०१९ सालची एक अप्रतिम भेट आणली आहे. त्याने मराठीतल्या २६ वेगवेगळ्या सिनेकलाकारांना घेऊन एक कॅलेंडर तयार केलंय. या कॅलेंडरचं नाव आहे ‘वंदे मातरम २०१९'. नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असणार की कॅलेंडरमध्ये काय पाहायला मिळेल. हे कॅलेंडर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सेनानींना अर्पण करण्यात आलंय.
२६ सिनेकलाकार आणि २६ स्वातंत्र्य सेनानी अशी ही कल्पना आहे. या कॅलेंडरचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला काही अज्ञात स्वातंत्र्यसैनिक भेटतात. उदाहरणार्थ प्रितीलता वड्डेदार, सुब्रमण्य भारती, बेगम हजरत महाल आणि असे बरेचजण. कलाकारांची निवडही कौतुकास्पद आहे. काही कलाकार तर आपल्याला ओळखूही येणार नाहीत इतके त्या भूमिकेत फिट बसले आहेत.
चला तर मंडळी आता पाहूयात हे १२ स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांना साकारणारे आजचे आघाडीचे कलाकार. यातले काही कलाकार तर तुम्हाला ओळखतही येणार नाहीत!!
१. प्रीतिलता वड्डेदार - पूजा सावंत

ही आहे चित्तगाँग इथं जन्मलेली बंगाली क्रांतीकारक. प्रितीलता पेशाने शिक्षिका होती. इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही सूर्यसेन या बंगाली क्रांतीकारकाबद्दल वाचलंच असेल. प्रितीलता त्यांच्या सशस्त्र कांती गटात सामील झाली. तेव्हा तसा इतर लोकांचा स्त्रियांच्या त्यांच्या गटात घ्यायला विरोध होता. पण प्रितीलतेची जिद्द आणि स्त्रिया हत्यारे घेऊन जात असतील तर त्यांच्यावर सहसा संशय घेतला जात नाही या दोन्ही कारणांमुळं तिला त्या गटात घेतलं गेलं.
१९३२मध्ये पहारतळी इथल्या एका युरोपियन क्लबवर तिनं १५ इतर क्रांतीकारकांना घेऊन हल्ला केला. त्या क्लबावर "कुत्रे आणि भारतीय यांना प्रवेश नाही" अशी पाटी होती. या क्रांतीकारकांनी क्लबला आग लावली पण ते सगळे ब्रिटिश पोलिसांच्या हाती सापडले. ही अटक टाळण्यासाठी प्रितीलताने सायनाईड खाऊन आत्महत्या केली. तिचं वय तेव्हा अवघं २१ वर्षं होतं.
२०१२मध्ये आलेल्या चित्तगाँग नावाच्या सिनेमात मनोज वाजपेयीने सूर्यसेनची भूमिका केली होती, तर वेगा तमोटियाने प्रितीलताची.
अशी दिसायची प्रितीलता:
२. दामोदर हरी चाफेकर - आदिनाथ कोठारे

रॅंड नावाच्या जुलूमी इंग्रज अधिकाऱ्याने पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निराकरणाच्या नावाखाली जनतेवर जुलूम केला, स्त्रियांची विटंबना केली आणि त्याचा बदला म्हणून दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या तिघा चापेकर बंधूंनी या रॅंडला २२जून १८९७ साली गोळ्या घातल्या.
ब्रिटिश अधिकार्यांनी भारतीय जनतेचा अंत पाहिला आणि रागाच्या उद्रेकाला ते कारणीभूतही ठरले. रॅंड त्याच दिवशी न मरता ससून रूग्णालयात जुलैला वारला. फंदफितुरीमुळे चापेकर बंधूही इंग्रजांच्या हाती लागले आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. त्यांना मदत करणार्या एका शाळकरी मुलाला देखील दहा वर्षे सक्तमजुरीची सजा झाली.
" आम्ही ज्यावेळी भयंकर कृत्यास हात घालीत होतो. त्यावेळी भावी स्थिती मनात येत नसे असे नाही. पण त्याची पर्वा करीत नव्हतो व आताही आम्ही करीत नाही. लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही या अंतकालच्या मिरवणुकीस जास्त महत्व देतो."
- हुतात्मा दामोदर हरि चापेकर
(वडिलांना लिहिलेले पत्र - दि.१२/१०/१९९७, २२ जून १८९७ मधून साभार)
३. सुब्रमण्य भारती - अमेय वाघ

आता हे सुब्रह्मण्यम भारती म्हणजे कोण हे कुणालाच माहित नसेल. नावावरूनच ते दक्षिण भारतातले आहेत हे कळतं. त्यांना भारतीयर म्हणूनही ओळखलं जायचं. १८८२मध्ये जन्मलेले सुब्रह्मण्यम भारती लेखक, कवी, पत्रकार, स्वातंत्र्य चळवळीतले कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. त्यांना आधुनिक तमिळ साहित्याचे प्रणेते मानलं जातं. तमिळ साहित्यातलं त्यांचं योगदान मोठं आहे आणि तमिळ लेखकांच्या यादीत त्यांना मानाचं स्थान आहे.
स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लिहिलेल्या देशभक्तीपर जहाल कवितांमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढलं होतं. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांचं स्त्रीसुधारणा आणि जातीयवाद यांच्याबद्दल लिहिलेलं साहित्यही मोठं मोलाचं मानलं जातं.
भारतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकार १९८७पासून हिंदी साहित्यातल्या उत्कृष्ट रचनेसाठी सुब्रह्मण्यम भारती हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देत आहे. कोईमतूरच्या राज्य विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलंय. इतकंच नाही तर आपल्या संसद भवनात आणि चेन्नईच्या मेरिना बीचवर त्यांचा पुतळाही उभारण्यात आला आहे.
४. कॅप्टन लक्ष्मी सहगल - श्रेया बुगडे

५. मंगल पांडे - शरद केळकर

६. ए. व्ही. कट्टीमलू अम्मा - प्रिया बापट

७. सावित्रीबाई फुले - सई ताम्हणकर

८. बिरसा मुंडा - प्रियदर्शन जाधव

९. बेगम हजरत महाल - तेजश्री प्रधान

१०. उधम सिंह - डॉ. अमोल कोल्हे

११. शिवराम हरी राजगुरू - सिद्धार्थ जाधव

१२. राजकुमारी गुप्ता - प्राजक्ता माळी

१३. मणीबेन पटेल - स्पृहा जोशी

१४. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - सुनील बर्वे

१५. अशफाक उल्ला खान - अक्षय टांकसाळे

१६. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - सौरभ गोखले

१७. कनकलता बरुआ - सोनाली कुलकर्णी

१८. दुर्गा भाभी - उर्मिला कानिटकर

१९. कल्पना दत्त - श्रिया पिळगावकर

२०. नेताजी सुभाषचंद्र बोस - सागर देशमुख

२१. कित्तूर राणी चेन्नम्मा - नेहा महाजन

२२. चंद्रशेखर आझाद - प्रवीण तरडे

२३. उमाबाई कुंदापूर - प्रियांका बर्वे

२४. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके - ललित प्रभाकर

२५. अझीझान बाई - हृता दुर्गुळे
