computer

ट्रम्पचं मंदिर बांधणाऱ्याचा मृत्यू झालाय, कोण होता तो आणि त्याच्या मृत्यूचं कारण काय ?

भारतात आपल्या नेत्यांसाठी जीव द्यायला देखील तयार असलेले असे अनेक कार्यकर्ते सापडतात. काहीजण अशी नुसती भावनाच बाळगत नाहीत, तर प्रसंगी जीव देतातही. भारतात काही नेत्यांच्या मृत्यूनंतर आत्महत्या केलेल्या लोकांचीही देखील अनेक उदाहरणे आहेत. पण परदेशात एखाद्या नेत्यासाठी असा जीव ओवाळून टाकणारे मात्र सहसा सापडत नाहीत.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे मंदिर त्यांच्या एका चाहत्याने भारतात बनविले होते. बुसा कृष्णन असे त्यांचे नाव. त्यावेळी अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता. पण आता जे घडले ते वाचून कृष्णन यांचे खरोखर ट्रम्प यांच्यावर खूप प्रेम होते हेच सिद्ध होईल.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांना कोरोनाचे निदान झाले होते. ही गोष्ट ऐकताच कृष्णन यांना या गोष्टीचे अतीव दुःख झाले. तेलंगणा येथे शेती करणारे कृष्णन ट्रम्प यांना कोरोना झाला त्या दिवसापासून सातत्याने चिंतेत होते, रविवारी सकाळी अचानक चहा पिताना ते पडले. दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असे घोषित केले.

खरंतर ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करून आपण आता ठणठणीत असल्याचे सांगितले होते. पण कदाचित कृष्णन यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली नसावी. गेल्या वर्षीच कृष्णन यांनी ट्रम्प यांचे मंदिर बांधले होते. त्यांच्या नातेवाईकांच्या सांगण्याप्रमाणे कृष्णन दररोज ट्रम्प यांच्या प्रतिमेची पूजा करत होते.

दक्षिण भारतातल्या सिनेमातल्या नटनट्यांच्या मंदिरांबद्दल ऐकलं होतं. त्यांच्या फॅन्सच्या अतिप्रेमाबद्दलही वाचलं होतं, पण हे प्रकरण जरा जास्तच वाटत नाही का तुम्हांला?

सबस्क्राईब करा

* indicates required