computer

या माणसाने ट्रम्प तात्यांचा पुतळा उभारून त्याची पूजा का केली ?? तो काय म्हणतोय पाहा !!

एवढ्या दिवसात नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांचा पुतळा उभा राहिला नाही,  पण भारतात चक्क ट्रम्पतात्याचा पुतळा उभा राहिला आहे. म्हणजे अमेरिका तर अमेरिका, भारतातसुध्दा तात्याची हवा आहे राव!! तुम्हाला तो तात्यांचा फॅन कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेल तर मंडळी तो आहे तेलंगणा मधला शेतकरी बुसा कृष्णा!!

या भावाने त्याचे तात्याप्रेम इतके पुढे नेले कि चक्क त्यांचा पुतळाच उभा करून टाकला. १४ जूनला डॉनल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस होता. तर अमेरिकेत सुद्धा त्यांना एवढे भारी गिफ्ट कोणी दिले नसेल ते कृष्णाने दिले राव!! हे कमी कि काय म्हणून गड्याने तात्यांना चक्क दुधाचा अभिषेक केला राव.  याचे डॉनल्ड ट्रम्पची पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हा भाऊ रातोरात फेमस झाला राव!

सकाळी सकाळी सर्वसाधारण माणूस काय करतो, तर देवपूजा करून देवाला टिळा लावून प्रसाद दाखवतो. पण हा भाऊ हेच सर्व डॉनल्ड तात्यासाठी करत असतो. रोज सकाळी चंदन, अगरबत्ती लावून डॉनल्ड ट्रम्पची पूजा कृष्णा करतो. कृष्णाला जेव्हा तात्यांच्या पूजेचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले कि आपण जेवढे जास्त प्रेम त्यांना देऊ तेवढे ते भारताच्या जवळ येतील. म्हणून मी त्यांची पूजा सुरू केली.

मंडळी, तुम्ही म्हणाल हे सगळे पब्लिसिटीसाठी करतात.  तर त्यावर हा भाऊ सांगतो कि, मी हे सगळे भारत आणि अमेरिकेमधील सबंध चांगले व्हावेत यासाठी करत आहे. मंडळी, जर असे पूजा करण्याने आणि पुतळा उभरण्याने जर दोन देशामधले संबंध सुधारले असते तर एवढे प्रयत्न करण्याऐवजी सगळ्यांनी पुतळे उभारले असते नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required