हा भारतातला माणूस ट्रम्प तात्यांना देव्हाऱ्यात ठेऊन पूजा का करतोय ?

Subscribe to Bobhata

ट्रम्प तात्या अख्ख्या जगात फेमस हायती पन आजवर कोनी त्यांची पूजे केली नव्हती राव. पन प्रत्येक महान व्यक्तीला एक भक्त लाभतो तसा आपल्या तात्यांना सुद्धा लाभला हाये. या भक्ताने आपल्या घरात सगळ्या देवांबरोबर तात्यांची प्रतिष्ठापना केली हाय. अन तो रोज त्यांची पूजा अर्चा करत असतोया. आता तुमी म्हनाल हा काय येडचाप मानुस हाय. त्याचं काय हाय ना हा मानुस एका मोठ्या कारणासाठी ट्रम्प तात्याची पूजा करतोय. ते काय कारण हाय ते बघा चला !!

मनमौजी तात्या (स्रोत)

या मानसाचं नाव हाय ‘बुसा कृष्णा’. मुक्कामपोस्ट जनगाव, तेलंगणा. ‘बुसा कृष्णा’ एक सामान्य शेतकरी हाय. त्यानं आपल्या देव्हाऱ्यात ट्रम्प तात्यांचा फोटो ठेवलाय. त्यानं तर फोटोला दुधाने अभिषेकपण केला. हे सगळं ट्रम्प तात्यांना खुश करण्यासाठी.

त्याचं काय झालं माहित्ये, गेल्यावर्षी फेब्रुवारी मध्ये श्रीनिवास कुचिभोटला या इंजिनियरची भारतीय असल्याच्या कारणावरून हत्या झाली. ही हत्या म्हणजे बघा अमेरीकेच्या एका नौदलाच्या ऑफिसरने केली होती. आता हे बुसा कृष्णाला समजल्यानंतर त्याने पह्यल्यांदा काय केलं असल तर त्यानं ट्रम्प तात्यांसाठी पूजा बांधली. अन तेव्हा पासून आता पर्यंत तो पूजा करतोय.

त्यांचा भक्त (स्रोत)

त्याचा मुद्दा काय तर ट्रम्प तात्यांना अन अमेरिकन लोकांना कळावं की भारतीय किती प्रेमळ अन मोठ्या मनाचे हायत ते. अन त्याला विश्वास हाय की एक ना एक दिवस सगळ्या अमेरिकेला आणि तात्यांना सुद्धा भारतीयांचं महत्व पटेल.

पन मी काय म्हणतो, भारतीय किती प्रेमळ हायत यापेक्षा भारतीय किती भोळसट हायत हेच यातून सिद्ध होतंय. बाकी ट्रम्प तात्यांना या निमित्ताने एक भक्त मिळाला हे बेस झालं.

 

आणखी वाचा :

डोनाल्ड तात्याचा नग्न पुतळा विकला गेला तब्बल एवढ्या मोठ्या किमतीला....

'ट्रम्प' तात्यांचं नाव असलेलं हे भारतातलं गाव माहितीये का ?...वाचा बरं कुठे आहे हे गाव !!!

बघा गोट्यानं घेतलेला ट्रम्प तात्याचा इंटरव्यू...तात्या बघणार भारत पाकिस्तान मॅच !!

'मुरंबा' बघून ट्रम्प तात्या झाले मिथिलावर फिदा...बघा हा व्हीडोओ !!

ट्रम्प तात्यांचा बाहूबली रिव्ह्यू आणि तोही मराठीत !!

 

सबस्क्राईब करा

* indicates required