बघा गोट्यानं घेतलेला ट्रम्प तात्याचा इंटरव्यू...तात्या बघणार भारत पाकिस्तान मॅच !!!

ये फुकणीच्या !! अर साईड दे की, डोळे फुटले का? साईडला जाऊन नाच की.. तात्या यायलेत नव्हं? काय लेका तू पन. अर त्या हलगीवाल्याला बोल जरा जोर लावून वाजीव, सकाळी संत्र्याची काय फुकट दिली का?
तर मंडली उद्या हाय मोठा दिवस. लय मोठा दिवस. अनुष्काचे देवर अन सानियाचे देवर दोघं आमने सामने भिडणार हायत. मायला उद्याचा अख्खा दिवस टीव्ही समोर बसणार म्या तर.
आता ट्रम्पतात्याला जसा मुरंबा आवडला तसा त्यांना का न्हाय क्रिकेट मधी पन रस हाय. रस म्हणजे चांगला आमरस हाय भौ....आता थेट मुद्द्याचं बोलायचं झालं तर उद्याच्या भारत पाकिस्तानच्या मॅचबद्दल ट्रम्पतात्यांचा एक इंटरव्यू आपल्या गोट्यानं घेतलाय. ट्रम्पतात्याचं क्रिकेटवर असलेलं प्रेम बघून उर भरून येईल राव.. आता जास्त काही बोलत बसत नाय, नाही तर ट्रम्पतात्या स्टम्प फेकून मारत्याल.
मटकीला मोड नाय....ट्रम्प तात्याला तोड नाय !...आता थेट बघा हा इंटरव्यू !!!