१८ व्या वर्षी वेटर असणारा कसा झाला वेस्ट इंडिजचा सक्सेसफुल कर्णधार? वाचा..

तो फलंदाजीला येताच गोलंदाज थरथर कायायचे. त्याचा शॉट म्हणजे बंदुकीची गोळी असायची. चौकार आणि षटकार मारणं तर या फलंदाजासाठी डाव्या हाताचा खेळ होता. आम्ही कोणाबद्दल बोलतोय याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आम्ही बोलतोय वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज सर विवियन रिचर्ड्सबद्दल .

व्हिव्हियन रिचर्ड्सची गोष्ट जरा हटके आहे. या खेळाडूचा जन्म गरीब कुटुंबात झाला. वयाच्या १८ व्या वर्षी रिचर्ड्स एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचे पण असे असतानाही त्यांनी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य केलं.

गिफ्ट म्हणून मिळाली क्रिकेट किट..

व्हिव्हियन रिचर्ड्स यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळायची प्रचंड आवड होती. ते आपले भावंडं मर्विन आणि डॉनल्डसह क्रिकेट खेळायचे. ते अँटिगा संघाचे माजी कर्णधार पॅट इंवेसनसह सराव करायचे.

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली आणि रेस्टॉरंटमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ते जिथे काम करायचे त्या हॉटेल मालकाला माहीत होतं की, व्हिव्हियन खूप चांगलं क्रिकेट खेळतो. हे पाहून हॉटेल मालकाने १८ वर्षीय व्हिव्हियन रिचर्ड्सला क्रिकेट किट गिफ्ट केली. त्यानंतर त्यांनी सेंट जॉन्स क्रिकेट क्लब जॉईन केला. अवघ्या ३ वर्षांनंतर त्यांनी वेस्ट इंडिज संघासाठी पदार्पण केले.

व्हिव्हियन रिचर्ड्सची जोरदार कामगिरी...

व्हिव्हियन रिचर्ड्सना आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात हवी तशी करता आली नव्हती. १९७४ मध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये २६१ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर १९७५ मध्ये त्यांना अवघ्या १९ च्या सरासरीने २१० धावा करता आल्या होत्या. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्हिव्हियन रिचर्ड्स नावाची स्तूनामी आली. १९७६ मध्ये त्यांनी ७ शतके ठोकली. यादरम्यान त्यांनी ९० च्या सरासरीने १७१० धावा केल्या होत्या. आपल्या कारकिर्दीतील १२१ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ५० पेक्षाही अधिकच्या सरासरीने ८५४० धावा केल्या होत्या.

क्रिकेटपटूसह होते उत्तम फुटबॉलपटू...

व्हिव्हियन रिचर्ड्स हे केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर एक उत्कृष्ट फुटबॉलपटू देखील होते. त्यांनी अँटिग्वाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामनाही खेळला होता. मात्र, नंतर त्यांनी संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले.

सबस्क्राईब करा

* indicates required