Cricket Facts: ३ वेळा संपूर्ण संघाला मिळालाय सामनावीर पुरस्कार! कधी ते माहितेय का?

Team won man of the match award:क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. तर संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मालिकावीर पुरस्कार दिला जातो. मात्र तुम्ही कधी संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार मिळाल्याचं ऐकलं आहे का? नाही ना? बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा सामन्याबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार दिला गेला होता.

क्रिकेट इतिहासात १९९६ मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार दिला गेला होता. १९९६ मध्ये न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज संघाला ४ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात ४ फलंदाजांनी धावा केल्या होत्या. तर ६ गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार दिला गेला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच या संघाला मिळाला सामनावीर पुरस्कार.  

 कसोटी क्रिकेटमध्ये १९९९ मध्ये पहिल्यांदाच कुठल्या संघाला सामनावीर पुरस्कार दिला गेला होता. हा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडिज संघाला ३५१ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यानंतर संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

पाकिस्तान संघालाही मिळाला होता सामनावीर पुरस्कार. .

1996 साली इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यातही हे घडले होते. या सामन्यात पाकिस्तानने २ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या प्रत्येक फलंदाजाने धावा केल्या, तर सर्व गोलंदाजांनीही विकेट घेतल्या. उत्कृष्ट सांघिक कामगिरी पाहून पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required