किती फलंदाजांनी कसोटीतील पहिल्याच चेंडूवर मारलाय षटकार? पाहा यादी..

कसोटी क्रिकेटला सुरुवात होऊन १४६ वर्षे होऊन गेली आहेत. १८७७ मध्ये पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. यादरम्यान अनेक मोठ मोठे रेकॉर्डस् झाले आहेत. मात्र तुम्हाला माहितेय का? कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रम कुठल्या फलंदाजाच्या नावे आहे? चला पाहूया.

कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग, विवियन रिचर्ड्स, मॅथ्यु हेडन, एबी डिविलियर्स सारखे आक्रमक फलंदाज होऊन गेले. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल की, कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची यादी खूप छोटी आहे. १४६ वर्षात केवळ एकदाच ही घटना घडली आहे.

केवळ युनिव्हर्स बॉसला जमला आहे हा पराक्रम..

युनिव्हर्स बॉस नावाने प्रसिध्द असलेल्या ख्रिस गेलने हा पराक्रम करून दाखवला आहे. असा पराक्रम करून दाखवणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने २०१२ मध्ये हा पराक्रम केला होता. हा सामना वेस्ट इंडिज विरुध्द बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. बांगलादेश संघाकडून ऑफ स्पिनर सोहाग गाजी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. याच सामन्यात गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. इतकेच नव्हे तर त्याने या षटकात तब्बल १८ धावा कुटल्या होत्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं होतं.( Batsman who hits six on the first ball of the test match Chris Gayle )

अशी राहिली कारकीर्द..

वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज ख्रिस गेल आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह अनेक लीग स्पर्धांमध्ये तुफान फटकेबाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्याने वेस्ट इंडिज संघासाठी १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४२.१९ च्या सरासरीने ७२१५ धावा केल्या आहेत. तर ३०१ वनडे सामन्यांमध्ये १०४८० धावा केल्या आहेत. तर ७९ टी -२० सामन्यांमध्ये त्याने १८९९ धावा केल्या आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required