डोनाल्ड तात्याचा नग्न पुतळा विकला गेला तब्बल एवढ्या मोठ्या किमतीला....

आपले डोनाल्ड तात्या अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासूनच चर्चेत हायेत. त्यांची हवा जगभरात झाली हाय. त्यांची एवढी क्रेज हाय की त्यांचा पुतळा तब्बल १८ लाखाला विकला गेलाय. हा पुतळा पण साधा नाय भाऊ. तात्या अगदी लहानपणी होते तसेच यात दिसतायत. ‘अंगावर नो एनी कपडा’.... या पुतळ्याला “एम्परर हॅज नो बॉल्स” असं म्हणत्यात.
मंडळी, एका म्हत्वाचं सांगतो. हा पुतळा त्यांच्या चाहत्यांनी बनवलेला नाय. हा पुतळा त्यांच्या विरोधकांनी बनवला हाये. इनडिक्लाईन नावाच्या कलाकारांच्या ग्रुपने तात्यांच्या विरोधात २०१६ रोजी हा पुतळा तयार केला होता. त्याकाळात तात्या निवडणुकीच्या प्रचारात बिझी होते. त्यांचा अपमान करणारा हा पुतळा तयार करून काय उपेग झाला नाय. तात्या हिलरी मावशींना हरवून बहुमतांनी विजयी झाले. असा हाय तात्यांचा करिष्मा !!
न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, क्लीव्हलँड, लॉस एंजल्स, आणि सिएटल या शहरांमध्ये असे ४ पुतळे लावण्यात आले होते. त्यातील शेवटच्या पुतळ्याचा नुकताच लिलाव केला गेला. ‘ज्युलियन्स ऑक्शन’ या लिलाव कंपनीने म्हटलं होतं की तात्यांचा पुतळा ३०,००० डॉलर्सला विकला जाईल. पण काही हरकत नाही. पुतळ्याला २८,००० हजार डॉलर्स एवढी किंमत मिळाली हाये. ही किंमत पण काय कमी हाय का भौ !!
मटकीला मोड नाय, डोनाल्ड तात्याला तोड नाय !!
आणखी वाचा :
'ट्रम्प' तात्यांचं नाव असलेलं हे भारतातलं गाव माहितीये का?...वाचा बरं कुठे आहे हे गाव!!!