'ट्रम्प' तात्यांचं नाव असलेलं हे भारतातलं गाव माहितीये का?...वाचा बरं कुठे आहे हे गाव!!!

मंडळी हल्लीच्या जमान्यात कधी काय होईल सांगता येत नाही. आपण बाळाचं बारसं करतो पण आज पहिल्यांदाच एका गावाचं बारसं झालंय. अहो मस्करी नाय राव !! खरंच झालंय.
हे गाव आहे हरियाणातलं ‘मरोड़ा गाव’. ‘सुलभ इंटरनॅशनल’ एनजीओनं या गावाला दत्तक घेतलंय आणि त्याच बरोबर नवीन नावंही दिलंय. नाव पण असं आहे की एकदम शाही वाटतंय जणू! काय म्हणून काय विचारताय? आपल्या ट्रम्पतात्याचं नाव दिलंय गावाला राव ! ‘ट्रम्प सुलभ गाव’...आता बोला !
सुलभ इंटरनॅशनल ही एनजीओ देशात शौचालय बनवून सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर आहे. या एनजीओनं गावाला शौचालयाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी दत्तक घेतलंय. त्यासाठी गावाला ट्रम्प तात्याचं नाव देणं म्हणजे जाम हटके बात आहे.
माणसांचं ध्यान या कार्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि अमेरिकेतून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी गावाचं नाव ‘ट्रम्प सुलभ गाव’ ठेवलं असल्याचं सुलभ इंटरनॅशनल चे संस्थापक ‘बिंदेश्वर पाठक’ यांनी म्हटलंय.
मरोड़ा गावातले लोक गरिबीमुळे शौचालय बनवण्यासाठी असमर्थ आहेत. आजही या गावातले लोक उघड्यावर शौच करतात. महिलांसाठी तर ही एक मोठीच समस्या आहे. गावातल्या काही महिलांनी तर एवढं सुद्धा म्हटलं की पैसे असते तर आम्हीच शौचालय बांधले असते.
मंडळी हे नाव अधिकृत नसून नकाशावर गावाचं नाव मरोड़ा गाव असंच असेल !
राव या गावातल्या माणसांना ट्रम्प तात्या हा कोणत्या ग्रहावरचा प्राणी आहे हे देखील माहित नसेल पण काय फरक पडतो...विकास झाला पाहिजे. नाय का ?
आणखी वाचा :
'मुरंबा' बघून ट्रम्प तात्या झाले मिथिलावर फिदा...बघा हा व्हीडोओ !!!
ट्रम्प तात्यांचा बाहूबली रिव्ह्यू आणि तोही मराठीत !!!