computer

झपाटलेली १० पेंटिंग्ज !! त्यांच्या कहाण्यांवर तुमचा विश्वासच बसणार नाही राव !!

मंडळी जगात अशी १० चित्रे आहेत ज्यांच्याबद्दल विचित्र समजुती पसरलेल्या आहेत. या समजुती नसून सत्य असल्याचं अनेकांनी आपल्या अनुभवावरून सांगितलं आहे. या १० चित्रांमध्ये जादू किंवा भुताटकी असल्याचं म्हटलं जातं. एकप्रकारे ही चित्रे झपाटलेली आहेत. त्यांना पहिल्याने किंवा घरात ठेवल्याने वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आल्याचं आजवर म्हटलं जातं.

आज पाहूयात ही १० चित्रे आहेत तरी कोणती आणि त्यांच्याबद्दल काय कथा सांगितल्या जातात.

१०. बाहुली आणि मुलगा.

ह्या चित्राला “The Hands Resist Him” म्हणतात. असं म्हणतात की हे पेंटिंग ज्या आर्ट गॅलरीमध्ये ठेवलं होतं, तिकडच्या मालकाच्या मृत्यूला हे पेंटिंगच जबाबदार आहे. त्याचबरोबर ह्या पेंटिंगबद्दल पहिल्यांदा लिहिणाऱ्या एका अभ्यासकाचाही मृत्यू याच पेंटिंगमुळे झाला.

२००० साली eBay वर हे पेंटिंग विकण्यासाठी आलं तेव्हा त्यापाठी एक कथा जोडण्यात आली होती. या कथेनुसार पेंटिंगमध्ये भुताटकी होती. पुढे जाऊन असंही म्हटलं जाऊ लागलं की पेंटिंगमध्ये दिसणारा मुलगा आणि बाहुली पेंटिंगमधून बाहेर येतात. 

९. गळफास घेणारा माणूस.

वरील सर्व चित्रांच्या बाबतीत चित्र तयार झाल्यानंतर त्यांच्यातील विचित्र गोष्टी दिसून आल्या आहेत. पण या चित्राच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. हे चित्र काढणाऱ्या लौरा पी यांनी चित्र काढताना त्यांना विचित्र अनुभव आल्याचं सांगितलं आहे. हे चित्र जिथे जिथे ठेवलं तिथे काही अलौकिक घटना घडल्या ज्यासाठी ह्या चित्राला जबाबदार धरण्यात आलं.

८. आईचा मृत्यू

या चित्राकडे बघितल्यावर रडण्याचा आवाज येतो असा अनुभव पाहणाऱ्यांनी सांगितला आहे. यावरून हे चित्र चर्चेत आलं होतं. असं म्हणतात की चित्रात मागे दिसणारी बाई ही एडवर्ड मंच या चित्रकाराची आई आहे. एडवर्डने आपल्या आईच्या आठवणीत हे चित्र काढलं होतं. समोर दिसणाऱ्या मुलीने आपले कान झाकून घेतले आहेत. तिने कान का झाकलेत याबद्दल अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. 

चित्राकडे नीट लक्ष देऊन ऐकल्यास रडण्याचा आणि हुंदक्यांचा आवाज येत असल्याचं म्हटलं जातं. या चित्राच्या भोवती असलेल्या गूढपणा त्यामुळे आणखी गडद झाला.

७. पाऊस आणि स्त्री

Svetlana Telets या चित्रकाराने हे चित्र ५ तासांत तयार केलं. तिने आपला अनुभव सांगताना म्हटलंय, “कोणते तरी अदृश्य हात माझ्याकडून चित्र काढून घेत होते.” या चित्राला खरेदी करणाऱ्या प्रत्येकाने त्याला लगेचच परत केलं आहे. निद्रानाश, उदासीनता, चिंता आणि कोणी तरी आपल्याला बघत असल्याचा अनुभव लोकांना आला आहे.
 

६. Man Proposes, God Disposes

हे चित्र एडविन हेन्री लॅडसीर या चित्रकाराने काढलं होतं. फ्रँक्लीन नामक दर्यावर्दीच्या हरवलेल्या जहाजाच्या शोधात असताना जे दृश्य दिसलं ते  म्हणजेच हे चित्र. या चित्राला लंडनच्या विद्यापीठात ठेवल्यानंतर मुलांना विचित्र अनुभव येऊ लागले होते. दरवर्षी परीक्षेच्या काळात या चित्राला इंग्लंडच्या युनियन जॅकने (झेंडा) झाकले जाते जेणेकरून मुलांवर त्याचा परिणाम होऊ नये.

५. रडणारे मूल.

ग्लोवानी ब्रागोलीन नावाच्या चित्रकाराने अशा प्रकारची ६० चित्रे तयार केली होती. त्यातील सगळ्याच चित्रांबद्दल तक्रारी आहेत. ही चित्रे आगीला आकर्षित करतात असं म्हटलं जातं. लोकांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरात लागलेल्या आगीने घर जळून खाक झालं तरी चित्राला साधी झळसुद्धा लागलेली नाही.

४. लव्ह लेटर

१८८७ साली एका अमेरिकन सिनेट सदस्याची ४ वर्षांची मुलगी पायऱ्यांवरून घसरून पडली. तिच्या मृत्युच्या वेळी हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. या चित्रातील मुलीचे हावभाव बदलत असल्याचं लोकांकडून वारंवार बोललं गेल्यानंतर या चित्राला झपाटलेल्या चित्रांच्या यादीत टाकण्यात आलं. या चित्रात त्या चिमुकल्या मुलीने प्रवेश केला असल्याचं म्हटलं जातं.

३. बर्नार्डो दे गोल्वेज यांचं व्यक्तिचित्र

बर्नार्डो दे गोल्वेज हे स्पॅनिश मिलिटरी ऑफिसर होते. त्यांच्या नावाने असलेल्या अमेरिकन हॉटेलमध्ये त्याचं चित्र लावण्यात आलं होतं. तिथे येणाऱ्या माणसांनी चित्राबद्दल तक्रार करताना म्हटलंय की चित्रात दिसणाऱ्या गोल्वेज यांचे डोळे पाहणाऱ्याचा पाठलाग करतात. त्याबरोबरच चित्राच्या जवळ गेल्यानंतर लोकांना अस्वस्थता जाणवते.

२. मृत्यू कैद केलेलं चित्र

चित्रकार Zdzisław Beksiński ने या चित्राला तयार केलं त्यावेळची त्यांची मनस्थिती काय होती हे आधी समजून घेतलं पाहिजे. ते बऱ्याच काळापासून मृत्यूने घेरलेले होते. त्यांच्या पत्नीच्या अकाली मृत्यूने ते खचलेले असताना त्यांच्या मुलाने देखील आत्महत्या केली. या दोन मृत्युंनी त्यांच्या मनात जे विचार निर्माण झाले ते या चित्रात दिसतात. २००५ साली भोसकून त्यांचा खून करण्यात आला. असं म्हणतात की या चित्राकडे बघत राहिल्याने मृत्यूपर्यंत गोष्टी जाऊ शकतात.

१. रक्ताने तयार केलेलं चित्र

या चित्राला तयार करणाऱ्या चित्रकाराने स्वतःच्या रक्तात तेल मिसळून हे चित्र रंगवल्याचं सांगितलं जातं. चित्र तयार झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली होती. त्याच्या आजीने या चित्राला स्वतःजवळ ठेवलं आणि काहीकाळाने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्युच्या आधी तिने या चित्राबाबत रॉबिन्सन नामक व्यक्तीला सांगितलं होतं. आजीच्या मृत्युनंतर रॉबिन्सनला या चित्रामध्ये काही अलौकिक शक्ती असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याने चित्राला कायमचं एका अज्ञात जागी बंद करून ठेवलं आहे. या जागेबद्दल रॉबिन्सन शिवाय कोणालाच माहित नाही. चित्रकाराने स्वतःच्या रक्ताने तयार केल्यामुळे चित्र झपाटलेलं आहे असं म्हटलं जातं.

पाह्यलंत, कसली भयानक चित्रं आहेत ही !!

 

आणखी वाचा :

प्लास्टिकवर साकारले आहेत डायनॉसोर, माकड, अस्वल....या कलाकाराची भन्नाट आयडिया बघितली का ?

हा फोटो आहे की पेंटिंग ? तुम्हीच बघा !!

राजा रवी वर्मा यांचं हे चित्र विकलं गेलंय तब्बल एवढ्या मोठ्या किमतीला !!

या चित्रकाराने ८० वर्षांपूर्वीच चितारला मोबाईल, तुम्हांला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required