राजा रवी वर्मा यांचं हे चित्र विकलं गेलंय तब्बल एवढ्या मोठ्या किमतीला !!

सोथबी संस्थेने आयोजित केलेल्या ‘आधुनिक आणि समकालीन दक्षिण आशियाई कलांचा लिलाव’ न्यूयॉर्क येथे करण्यात आला होता. या लिलावात राजा रवी वर्मा यांच्या ‘तिलोत्तमा’ या चित्राला एका अज्ञात व्यक्तीने विकत घेतलं. यावेळी लावलेली शेवटची बोली ठरली तब्बल ७९५,००० डॉलर म्हणजे जवळजवळ ५ कोटी रुपये.

विक्रेत्यांनी ज्या किमतीत हे चित्र लिलावात ठेवलं होतं त्यापेक्षा दुप्पट किमतीत ते विकलं गेलं आहे. विक्रेत्यांच्या अंदाजानुसार ४००,००० ते ६००,००० डॉलर पर्यंत चित्राला बोली अपेक्षित होती. पण या चित्राने त्यापुढे मजल मारली. सोथबी संस्थेने २०१७ साली रवी वर्मा यांचं ‘दमयंती’चं चित्र लिलावात विकलं होतं. या चित्राला तब्बल १२ लाख डॉलर्सची बोली लावली गेली होती.

चित्राविषयी

स्रोत

पुराणातली ‘तिलोत्तमा’ या अप्सरेचं हे चित्र आहे. असं म्हणतात की ब्रह्माने या अप्सरेला जगातील सर्व सुंदर गोष्टींच्या कणातून तयार केलं होतं. इथे तीलचा अर्थ मराठीतील तीळ असाच होतो. जगातील तीळ तीळ सौंदर्य जमा करून तयार करण्यात आलेली जगातील सर्वात सुंदर स्त्री असा याचा अर्थ होतो.

रवी वर्मा यांनी हे चित्र १९३६ साली तयार केलं. त्यांची सही आणि तारीख आजही आपण या चित्राच्या खाली पाहू शकतो. राजा रवी वर्मा यांनी अनेक पौराणिक प्रसंग ताकदीने कॅनव्हासवर उभे केले. त्यातील हे एक ‘मास्टरपीस’ आहे.

 

आणखी वाचा :

राजा रविवर्मांचा अद्भुत कलाविष्कार !!

सबस्क्राईब करा

* indicates required