computer

प्लास्टिकवर साकारले आहेत डायनॉसोर, माकड, अस्वल....या कलाकाराची भन्नाट आयडिया बघितली का ?

‘सेलोफोन’ या विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकचा वापर खाद्यान्न पॅक करण्यासाठी होतो. बाहेरील हवेचा आणि जंतूंचा खाद्य पदार्थावर परिणाम होऊ नये म्हणून सेलोफोन वापरतात. आत्तापर्यंत तरी त्याचा असाच वापर होत होता पण रशिया मध्ये एक असा कलाकार आहे ज्याने सेलोफोनला चक्क कॅनव्हास सारखं वापरलंय.

चला जाणून घेऊ हा भाऊ नेमकं करतो तरी काय ?

या कलाकाराचं नाव आहे ‘एव्हेन्जी चेस’. या कलेला तो ‘सेलो-ग्राफिटी’ म्हणतो. त्याने आपल्या या कलाकारीसाठी जागाही थोडी हटके निवडली आहे. तो चक्क जंगलाच्या मधोमध हे काम करतो. त्याच्या कामाची सुरुवात होते ती सेलोफोन प्लास्टिकला जंगलातल्या दोन झाडांच्या मध्ये गुंडाळण्यापासून. याचा आकार इतका मोठा असतो की त्यावर एक अवाढव्य चित्र काढता येतं. त्यानंतर तो स्प्रेच्या मदतीने या प्लास्टिक कॅनव्हासवर अगदी खरी दिसतील अशी चित्रे काढतो. या कामासाठी त्याला तासंतास झटावं लागतं. एक प्रकारे ही स्प्रे-पेंटिंग सुद्धा आहे.

स्रोत

त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर हे काम करताना त्याला एकही चूक करणं परवडत नाही. हवेची हलकी झुळुकही चित्र बिघडवण्यासाठी पुरेशी असते. त्यामुळे खूपच बारकाईने त्याला काम करावं लागतं.

शहरातल्या भिंती चित्र काढण्यासाठी वापरणे हे आता नवीन राहिलेलं नाही. पण एव्हेन्जी म्हणतो की निसर्गाच्या मधोमध त्याला आपली कला सदर करायला आवडतं. आता तुम्ही म्हणाल की जंगलात हे सगळं करत असतान प्लास्टिकचा कचरा तर नक्की पसरत असणार. हे निसर्गासाठी हानिकारक आहे !!

हा विचार एव्हेन्जीने देखील केला त्यामुळे त्याचं चित्र एकदा तयार झालं की तो परतताना सगळा कचरा आणि त्याच बरोबर ते चित्रही तिथून काढून टाकतो, जेणेकरून तिथे प्लास्टिकचा कचरा उरणार नाही.

चला तर अश्या या भन्नाट आणि अप्रतिम कलेचे काही नमुने बघुयात :

सबस्क्राईब करा

* indicates required