हा फोटो आहे की पेंटिंग ? तुम्हीच बघा !!

नामिबियाच्या ‘नामिब नोकल्फ्ट पार्क’ या राष्ट्रीय उद्यानात असलेला ‘कॅमल थॉर्न’ या वृक्षामध्ये तसं बघण्यासारखं काही खास नाही. कोरड्या वालुकामय जागेवर वाढणारं हे एक झाड आहे. ‘नामिब नोकल्फ्ट पार्क’ हा नामिब वाळवंटाचा एक भाग असल्याने तिथे असलेले हे निष्पर्ण झाड अजूनच उदासवाणे वाटते. पण या वाळवंटानेही एक कमाल केली आहे राव.

जेव्हा वाळवंट, कॅमल थॉर्न झाड आणि निसर्ग एकत्र येतात तेव्हा काय कमाल होते हे तुम्ही या फोटो मध्ये बघू शकता. पण थांबा....हे नक्की फोटोच आहेत ना ? की कोणीतरी काढलेली चित्र ? नीट बघून घ्या हा.

स्रोत

२०११ साली 'नॅशनल जॉग्रॉफी चॅनेल'साठी ‘Frans Lanting’ या फोटोग्राफरने नामिबियाच्या ‘कॅमल थॉर्न’ या झाडांचा एक फोटो क्लिक केला होता. मागे नारंगी वाळवंट, समोर ५ झाडे आणि निळ्या रंगात न्हाऊन निघालेली जमीन. एखाद्या चित्रासारखं भासणारं हे छायाचित्र होतं.

एका निर्जीव वाटणाऱ्या ठिकाणचं छायाचित्र एवढं मोहक असेल हे त्या फोटोग्राफरलाही वाटलं नसणार.

सबस्क्राईब करा

* indicates required