computer

टोईंगबाबतचे नवीन नियम जाणून घ्या मंडळी पटापट !!

मालाड मध्ये एक स्त्री आपल्या कार मध्ये मुलाला दुध पाजत असताना टोईंगवाल्यांनी कार तिच्यासोबतच ‘टो’ केली. ह्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि टोईंगवाल्यांच्या मुजोरीवर टीका झाली. या घटनेवरून धडा घेत अशी घटना पुन्हा घडू नये आणि टोईंगवाल्यांच्या मुजोरीला आळा बसावा म्हणून टोईंगबाबत नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. 

तुम्हाला या नियमांबद्दल माहिती आहे का ? नाही ? मग चला आम्हीच सांगतो !!

१. गाडी टो करण्याआधी भोंग्यावरुन सूचना देणं बंधनकारक असेल. सूचना देऊनही चालक तिथे आला नाही तरच गाडी टो करण्यात येईल.

२. ‘टो करण्यापूर्वी’ चालक आल्यास गाडी सोडून देण्यात येईल. यावेळी जर कार चालक गाडी घेऊन गेला तर त्याला दंडाशिवाय सोडून देण्यात येईल.

३. गाडी ‘टो करताना’ चालक आल्यास फक्त दंड आकारता येईल, मात्र टोईंग चार्जेस आकारता येणार नाहीत.

४. ‘टो केल्यानंतर’ चालक आल्यास दंड तसेच टोईंग चार्जेस आकारुन गाडी सोडून देण्यात येईल.

५. टोईंगच्या गाडीतील प्रत्येक अधिकाऱ्याकडे ई-चलन उपकरण आणि वॉकी-टॉकी देण्यात येईल. ई-चलन असल्याने कार चालकाची दंड भरण्यासाठीची फेरी वाचणार आहे.

तर मंडळी, पुढच्यावेळी गाडी पार्किंग करताना हे नियम नक्की लक्षात ठेवा !!

 

आणखी वाचा :

शनिवार स्पेशल : ट्रॅफिक पोलिसांना चिरीमिरी देण्याआधी या १० महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!

हा ट्रॅफिक हवालदार चिरीमिरी घेत नाही - इंदूरमध्ये रोबोट ट्रॅफिक हवालदार !

आता वाहनांची कागदपत्रं ठेवा घरी : पोलीसांना दाखवा मोबाईल ! 

सबस्क्राईब करा

* indicates required