computer

ट्रॅफिक पोलिसांना चिरीमिरी देण्याआधी या १० महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!

तुम्ही वाहन चालवताय आणि तुमची गाठ ट्रॅफिक पोलिसांशी पडली नाही, हे होणं अशक्य आहे. तुम्ही नियम तोडलेले असोत किंवा नसोत, पण आपला संपर्क ट्रॅफिक पोलिसांशी येतोच. मग समजा कधी तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलंच तर अशावेळेस काय कराल ? अशा प्रसंगी तुमची फसवणूक होऊ नये म्हणून खालील गोष्टी जाणून घ्या !!

१. जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला अडवलं आणि तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले असतील तर, ट्रॅफिक पोलिसांकडे कारवाई करण्यासाठी चलान असणं गरजेचं आहे. कागदी चलन किंवा ई-चलान या दोन्हीपैकी एक असणं आवश्यक आहे. वाहतूक पोलीस चलानशिवाय तुमच्यावर कारवाई करू शकत नाही.

२. ट्राफिक पोलिसांनी थांबवल्यानंतर सर्वात आधी तुम्ही गाडी बाजूला थांबवून त्यांना तुमचं लायसन्स किंवा कागदपत्र दाखवणं आवश्यक आहे.

मोटार व्हेईकल कायद्याच्या सेक्शन १३० मध्ये नमूद केल्याप्रमाणे ट्राफिक पोलिसांना तुम्ही कागदपत्र फक्त तपासण्यासाठी देऊ शकता. कोणताही अधिकारी तुमचे कागदपत्र जप्त करू शकत नाही. तुम्ही याची तक्रार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू शकता. हा हक्क तुम्हाला कायद्याने बहाल केला आहे. तुमचे कागदपत्र घेण्याचा अधिकार फक्त ए.एस.आय.सारख्या पदावर असलेल्या व्यक्तीलाच आहे.

३. जर तुमच्याकडून चुकून ट्राफिकच्या नियमांचं उल्लंघन झालं तर, तुम्ही ट्राफिक पोलिसांशी वादावादी करू नका. तुमचा मुद्दा त्यांना पटवून द्या. काहीवेळा तुमच्याकडून दंड न घेता सोडूनही देण्यात येतं.

४. तुम्हाला दंड होण्याची शक्यता फक्त खालील कारणांमुळे असू शकते.

१. सिग्नल तोडणे. २. हेल्मेट शिवाय बाइक चालवणे. ३. प्रमाणाबाहेरच्या गतीने गाडी चालवणे. ४. गाडीला नंबर प्लेट नसणे. ४. लायसन्सशिवाय गाडी चालवणे. ५. रजिस्ट्रेशन नसलेली गाडी चालवणे. ६. पार्किंगचे नियम तोडणे. ६. अधिकृत इन्शुरन्स आणि पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (पीयुसी) शिवाय गाडी वापरणे. ७. गाडीत धुम्रपान करणे.

५. लायसन्स जप्त होण्याची करणे :

जर तुम्ही सिग्नल तोडला आहे, दोनपेक्षा जास्त लोक एकाच बाइक वर आहेत, दारू किंवा अन्य नशा करून गाडी चालवत आहात, अवजड समान नेणाऱ्या गाडीत प्रवासी बसवलेले आहेत, प्रमाणाबाहेर स्पीडमध्ये बाइक चालवत असल्यास किंवा गाडी चालवताना मोबाईल वर बोलत असल्यास ट्राफिक पोलिसांनी पकडलं तर अशावेळेस तुमचे लायसन्स जप्त करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे.

६. पोलिसांना चिरीमिरी देऊ नका किंवा देण्याचा प्रयत्नही करू नका.

जर कोणत्या पोलिसाने लाच मागितली तर तो गुन्हा आहे. ट्राफिक पोलिसाने पकडल्यानंतर तुम्ही त्याचा नंबर आणि नाव तपासून घेणं गरजेचं आहे. जर युनिफॉर्मवर नाव आणि नंबर नसेल, तर तुम्ही त्यांना तुमचे कागदपत्र देऊ नका.

७. अधिकृत पावतीशिवाय ट्राफिक पोलीस तुमचे लायसन्स काढून घेऊ शकत नाही.

जर ट्राफिकचे नियम तोडताना पोलिसांनी पकडलंच तर, तुम्हाला १०० रुपयांच्या आतच दंड बसण्याची शक्यता आहे. हा दंडदेखील फक्त हेड कॉनस्टेबल घेऊ शकतो. १०० पेक्षा जास्त दंड घेण्याचा अधिकार फक्त एएसआई किंवा एसआई अधिकाऱ्यांना आहे.

८. जर ट्राफिक पोलिसाने तुमच्याशी गैरवर्तणूक केली तर तुम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवू शकता.

९. ट्राफिक इन्स्पेक्टर आणि त्याही वरच्या पदावरील अधिकाऱ्यांना सोडून वाहतूक पोलीस फक्त पांढऱ्या गणवेषात असतात. गणवेषाशिवाय कोणत्याही ट्राफिक पोलिसाला तुमच्याकडून दंड वसूल करण्याचा अधिकार नाही.

१०. शीख समुदायातील पगडी बांधणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट घालणं सक्तीचं नाही. शिवाय जर तुमच्या कानाच्या भागात सर्जरी झाली असेल तर, तुम्हाला हेल्मेट घालणे बंधनकारक नाही.

मंडळी हे मुद्दे लक्षात ठेवा आणि पुढच्यावेळी जेव्हा पकडले जाल तेव्हा आपल्या अधिकाराचा योग्य उपयोग करा आणि फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवा!!

सबस्क्राईब करा

* indicates required