f
computer

शनिवार स्पेशल : ५ असे भारतीय ज्यांना इंस्टाग्रामवर फॉलो केलंच पाहिजे !!

फेसबुक आणि व्हॉट्सऍप बरोबरच आजच्या घडीला सर्वात जास्त जनता कुठे असेल तर ते ठिकाण आहे "इंस्टाग्राम". इंस्टाग्रामच्या मदतीने आज अनेकजण आपली जगासमोर आणत आहेत. जगभरातल्या सेलिब्रिटींनी देखील ‘इंस्टा’ ची निवड केली आहे. मंडळी यात भारतीय सेलिब्रिटी सुद्धा काही मागे नाहीत बरं का.

पण राव, कला, खेळ, राजकारण, फिल्म क्षेत्रातल्या सेलिब्रिटींच सोडा, आज आम्ही तुम्हाला ५ अश्या भारतीयांची ओळख करून देणार आहोत जे चक्क इंस्टाग्रामवरचे सेलिब्रिटी आहेत. ते सेलिब्रिटी का आहेत हे त्यांच्या अकाउंट वरूनच तुम्हाला दिसेल. जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर या ५ जणांना फॉलो केलंच पाहिजे. पण ते ५ जण आहेत तरी कोण ? चला तर आज आम्ही एक एक करून तुमची गट्टी जमवून देतो.

१. मनीष लाखानी

मनीष हा एकेकाळी आयटी क्षेत्रात पूर्णपणे बुडालेला तरुण होता. त्याने २०१३ साली आपल्या कामाचा राजीनामा दिला आणि चक्क सायकल हातात घेतली. सायकल वरून तब्बल २२ राज्य आणि १५००० किलोमीटरचा प्रवास त्याने केला. या प्रवासात त्याने जे पाहिलं ते सगळं त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्या दिवसापासून आज पर्यंत तो आपल्या फोटोग्राफीच्या 'पॅशन'ला घेऊन प्रवास करतोय. हिमालय आणि लडाख बरोबर भारतातील दुर्गम भागात जाण्यापर्यंत आणि भारताबाहेर प्रवास करून भन्नाट अनुभव घेण्यापर्यंत त्याने एक प्रवासी म्हणून अनेक अनुभव जमा केले आहेत. त्याचं काम आणि प्रवास बघायचा असल्यास त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलच पाहिजे राव.

२. सुमेर वर्मा

सुमेर वर्मा हा समुद्राच्या प्रेमात पडलेला युवक आहे. तो सध्या 'डायव्हिंग प्रशिक्षक' म्हणून काम करतोय. १९९७ साली त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्याने आत्ता पर्यंत समुद्रखालील जीवनाची अप्रतिम फोटोग्राफी केली आहे. त्याच आज पर्यंतच काम बघता त्याने तब्बल ६००० वेळा डायव्हिंग केली आहे. त्याला समुद्री जीवनाचा दांडगा अनुभव आहे. निळाशार समुद्र आणि त्यातील जीवन बघण्यासाठी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला भेट द्या राव.

३. नीलिमा वाळ्ळंगी

That time when I was inadvertently smitten by a temple! . I'm not a religious or spiritual person so active temples hold little value to me if not offering historical and/or architectural enjoyment, which I'm very much fascinated with. So it was quite interesting to see how quickly I was captivated by Madurai's extremely famous Meenakshi Temple. I went there as an obligatory stop on our multi-day family trip through Tamilnadu but soon the long corridors, that lovely light and those gorgeous stone pillars holding up frescoed ceilings captured my imagination. Have been meaning to research more on Madurai Meenakshi temple's story but haven't gotten to it. . Tell me if you've got any interesting tidbit about the temple's history or architecture?

A post shared by Neelima Vallangi (@neelimav) on

७ वर्ष कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम केल्यानंतर नीलिमा ने आपल्या आवडीकडे मोर्चा वळवला. हिमालय आणि पश्चिम घाटांच्या दिशेने तिची पावलं वळली आणि तिने याच कामासाठी आयुष्य झोकून दिलं. ती सध्या फोटोग्राफर, लेखक आणि प्रवासी म्हणून ओळखली जात आहे. तिच्या कामाची दखल ‘नॅशनल जॉग्रॉफिक ट्रॅव्हलर’ सारख्या चॅनेल्स आणि महत्वाच्या मासिकांनी घेतली आहे. तिच्या कामाचा मागोवा तुम्ही इंस्टाग्रामवर घेऊ शकता.

४. शंकर श्रीधर

शंकर श्रीधर हा ट्रेकर, फोटोग्राफर आणि (प्रवासवर्णन) लेखक असून त्याला आज पर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. तसेच जगभरातल्या नावाजलेल्या आणि प्रतिष्ठीत मासिकांमध्ये त्याचं काम प्रकाशित झालेलं आहे. हिमालय आणि भारतातल्या दुर्गम भागात जाऊन फोटोग्राफी करणे हा त्याच्या प्रवासाचा मुख्य भाग आहे. त्याचं हे काम तुम्ही इंस्टाग्रामवर पाहू शकता.

५. मधुमिता नंदी

मधुमती नंदी ने आपल्या आयुष्याचं ध्येय हे प्रवास, प्रवास आणि फक्त प्रवास असं ठरवून टाकलेलं आहे. तिच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ती नवनवीन कथा लोकांपर्यंत पोहोचवते. 'उटी' पासून सुरु झालेला तिचा प्रवास आज जगभरात पोचलेला आहे. तुम्ही सुद्धा तिचं काम तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.

राव, या ५ मंडळीच्या कामाकडे बघून तुम्हाला अंदाज येईलच की आयुष्यात ध्येय किती महत्वाचं असतं ते.

सबस्क्राईब करा

* indicates required