computer

ऑस्कर जत्रा : ऑस्करच्या शर्यतीत असलेले ९ भन्नाट सिनेमे !!

उद्या ४ मार्च. फिल्मी जगतातला एक ऐतिहासिक दिन. उद्याच्याच दिवशी ऑस्कर विजेत्यांची घोषणा होणार आहे. मंडळी, यंदाच्या ऑस्कर मध्ये ९ सिनेमे निवडण्यात आलेले आहेत. यातील सर्वात जास्त १३ नॉमिनेशन मिळवलेला सिनेमा ‘द शेप ऑफ वॉटर’ असून त्याच्या खालोखाल ८ नॉमिनेशन मिळवलेला ‘डंकर्क’, ७ नॉमिनेशन मिळवलेला ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी’ आणि ६ इतर सिनेमे आहेत.

ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होण्याआधी आपण आज बघुयात या ९ फिल्म्स आहेत तरी कोणत्या आणि त्यांना कोणकोणते नॉमिनेशन आहेत.

१. द शेप ऑफ वॉटर

हा सिनेमा यंदाच्या ऑस्कर शर्यतीतला सर्वात दमदार सिनेमा मानला जातोय. तब्बल १३ नॉमिनेशन मिळवून या सिनेमाने आपलं स्थान अगदी पक्क केलं आहे. या सिनेमाबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर एका मूक मुलीचा आणि एका मानवा सारख्या दिसणाऱ्या प्राण्याचा प्रेमसंबंध दाखवणारी कथा  असं म्हणता येईल पण या कथेला अनेक कंगोरे आहेत.

 

नॉमिनेशन्स :

बेस्ट पिक्चर – गुएर्मो डेल टोरो, जे. माइल्स डेल

बेस्ट डायरेक्टर – गुएर्मो डेल टोरो

बेस्ट अॅक्ट्रेस  – सॅली हॉकिन्स

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर– रिचर्ड जेनकिन्स

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस  – ऑक्टेव्हिया स्पेंसर

बेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – गुएर्मो डेल टोरो, व्हेनेसा टेलर

बेस्ट सिनेमॅटोग्राफी – डॅन लाउस्टसन

बेस्ट फिल्म एडिटिंग – सिडनी वॉलिन्स्की

बेस्ट कॉस्चूम डिझाईन  – लुई सिक्वेरा

बेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर) – एलेग्झॅद्र दूप्ले

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन – पॉल डेनहम ऑस्टरबेरी; सेट डेकोरेशन – शेन विएऊ, जैफ्री ए. मैल्विन

बेस्ट साउंड मिक्सिंग – क्रिश्चियन कुक, ब्रैड ज़ोर्न, ग्लेन गौथियर

बेस्ट साउंड एडिटिंग – नेथन रॉबिटेल, नेल्सन फरेरा

२. डंकर्क

ख्रिस्तोफर नोलनचा नवा सिनेमा आणि द शेप ऑफ वॉटर सिनेमाच्या खालोखाल ज्याला ८ नॉमिनेशन मिळाले आहेत तो सिनेमा म्हणजे ‘डंकर्क’. डंकर्क बद्दलही यावर्षी चर्चा रंगल्या. नोलनच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक पर्वणी होता.

 

नॉमिनेशन्स :

बेस्ट पिक्चर  –  एमा थॉमस आणि ख्रिस्तोफर नोलन

बेस्ट डायरेक्टर – ख्रिस्तोफर नोलन

बेस्ट सिनेमॅटोग्राफी – हॉयटे वान हॉयटेमा

बेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर)  – हान्स झिमर

बेस्ट फिल्म एडिटिंग  – ली स्मिथ

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन  – नॅथन क्राउली; सेट डिझाईन – गॅरी फेटीस

बेस्ट साउंड एडिटिंग  – रिचर्ड किंग आणि एलेक्स गिब्सन

बेस्ट साउंड मिक्सिंग – मार्क वेइंगार्टऩ, ग्रेग लँडेकर आणि गैरी ए. रीझो

३. थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी

आपल्या मुलीच्या मृत्युच्या रहस्याचा पाठलाग करण्याऱ्या एका आईच्या भोवती हा सिनेमा फिरतो. ऑस्कर नॉमिनेशन्स मध्ये या सिनेमाला ७ पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेलं आहे.

 

नॉमिनेशन्स :

बेस्ट पिक्चर - ग्रॅहम ब्रोडबेन्ट, पेटे झेरनीन, मार्टिन मॅकडॉग

बेस्ट अॅक्ट्रेस  - फ्रान्सिस मॅकडॉरमंड

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर  - १. वूडी हेरल्स्न २. सॅम रॉकवेल

बेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – मार्टिन मॅकडॉग

बेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर) – कार्टर बुर्वेल

बेस्ट फिल्म एडिटिंग  – जॉन ग्रेगरी

४. डार्केस्ट अवर

डंकर्क नंतर ‘डार्केस्ट हवर’ हा सिनेमा महायुद्धावर आधारित आहे. हा सिनेमा तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यावर आधारित आहे. सिनेमात विन्स्टन चर्चिल यांचं पात्र साकारणारा अभिनेता 'गॅरी ओल्डमन' ला विन्स्टन चर्चिलच्या रुपात साकारताना प्रचंड मेहनत घेण्यात आलेली आहे. खऱ्या आयुष्यातील गॅरी ओल्डमन आणि सिनेमातील गॅरी ओल्डमन यांच्यात न ओळखता येण्यासारखा फरक दिसून येतो.

 

नॉमिनेशन्स :

बेस्ट पिक्चर –  टिम बेवन, एरिक फेलेनर, लिसा ब्रूस, अँथनी मॅककार्टन आणि डगलस उरबांस्की

बेस्ट अॅक्टर – गॅरी ओल्डमन

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन – सारा ग्रीनवुड; सेट डिझाईन: केटी स्पेन्सर

बेस्ट सिनेमॅटोग्राफी – ब्रूनो डेलबोनल

बेस्ट मेकअप आणि हेअरस्टाईल  – काझुहीरो त्सुझी, डेव्हिड मालीनोवस्की, लुसि सिबिक

बेस्ट कॉस्चूम डिझाईन  –  जॅकलिन डुरेन

 

५. फॅन्टम थ्रीड

ही एक रोमँटिक पीरियड ड्रामा फिल्म आहे. डॅनियल डे-लुईस या एका गुणी नटाचा हा शेवटचा सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय. २०१२ साली त्याला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचं ऑस्कर देखील मिळालं होतं.

 

नॉमिनेशन्स :

बेस्ट पिक्चर – जोअने सेलर, पॉल थॉमस अँडरसन, मेगन एलिसन आणि डॅनियल लुपी

बेस्ट डायरेक्टर – पॉल थॉमस अँडरसन

बेस्ट अॅक्टर – डॅनियल डे-लुईस

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस  – लेस्ली मॅनविले 

बेस्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोर) – जॉनी ग्रीनवुड

बेस्ट कॉस्चूम डिझाईन  –  मार्क ब्रिज

 

६. लेडी बर्ड

हा सिनेमा मुलगी आणि तिच्या आईच्या नात्यावर आधारित आहे. ऑस्कर नॉमिनेशन मिळण्याआधी बऱ्याच पुरस्कारांवरती या सिनेमाने बाजी मारली आहे.

 

नॉमिनेशन्स :

बेस्ट पिक्चर –  स्कॉट रुडिन, अॅली बुश आणि एवलिन ओ'निइल

बेस्ट डायरेक्टर – ग्रेटा गेरविग 

बेस्ट अॅक्ट्रेस  – साओइर्स रोनन

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस  – लॉरी मेटकॉफ

बेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – ग्रेटा गेरविग

७. गेट आऊट

हा एक थ्रिलर सिनेमा असून अमेरिकेतल्या वर्णभेदावर भाष्य करतो. या सिनेमाबाचं सिनेमाच्या जाणकारांकडून कौतिक झालेलं आहे.

 

नॉमिनेशन्स :

बेस्ट पिक्चर – शॉन मॅकेट्रिक, जेसन ब्लूम, एडवर्ड एच. हॅम जूनियर आणि जॉर्डन पीले

बेस्ट डायरेक्टर – जॉर्डन पीले

बेस्ट अॅक्टर – डॅनियल कालुया

बेस्ट राइटिंग (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – जोर्डन पीले 

८. कॉल मी बाय युवर नेम

आंद्रे अकिमान यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा समलैंगिक संबंधावर भाष्य करतो. या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमा बरोबर पटकथेसाठी सुद्धा ऑस्कर नॉमिनेशन मिळालेलं आहे.

 

नॉमिनेशन्स : 

बेस्ट पिक्चर – पीटर स्पीयर्स, लुका गदाग्निनो, एमिली जार्ज आणि मार्को मोरबिटो

बेस्ट अॅक्टर –  टिमोथी चेलमेट

बेस्ट अॅडोप्टेड स्क्रीनप्ले – जेम्स आइवरी (आंद्रे अकिमान यांच्या कादंबरीवर आधारित)

बेस्ट सॉंग – सुफ़न स्टीवंस (मिस्ट्री ऑफ लव्ह)

९. दि पोस्ट

स्टीवन स्पीलबर्ग या एका महान दिग्दर्शकाची ही नवी कोरी फिल्म. दि पोस्ट या फिल्मचं कथानक अमेरिका आणि व्हियेतनामच्या युद्धाच्या संदर्भातील राजकीय वातावरणावर आधारित आहे. प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘मेरील स्ट्रीप’ यांच्या बद्दल फिल्मी जगतात सध्या चर्चा होत आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नॉमिनेशनही मिळालेलं आहे.

 

नॉमिनेशन्स :

सर्वोत्कृष्ठ सिनेमा – एमी पास्कल, स्टीवन स्पीलबर्ग आणि क्रिस्टी मॅकोस्को क्रेगर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मेरील स्ट्रीप

 

 

या सर्व तगड्या दावेदारांमध्ये सर्वात पुढे कोणता सिनेमा निघतोय हे उद्या पाहण्या सारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required