होळी स्पेशल : थंडाई बनवण्याची रेसिपी बघून घ्या राव !!

उद्या धुळवड आहे. मग तुम्ही रंग खेळणार ना? मग त्यानंतर श्रमपरिहार म्हणून बरोबर थंडाई सुद्धा घेणार असाल!! पण थंडाई कशी बनवायची हे तुम्हाला माहित आहे का? नाही? मग भाऊ,  आम्ही सांगतो ना. उद्याची धुळवड आणखी भारी करण्यासाठी आज जाणून घ्या थंडाई कशी बनवायची ते. एकदम सोप्पं काम आहे ते.... कृती बघून घ्या राव...

स्रोत

१. एका भांड्यात बदाम, काजू, पिस्ता, कलिंगडाच्या बिया, खसखस, हिरव्या वेलची, दालचिनी आणि मिरपूड घेऊन ते एकत्र करा.

२. हे एकत्र केलेले पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घ्या.

स्रोत

३. यानंतर एका पॅनमध्ये दुध उकळायला ठेवा. थोड्यावेळाने दुधाला उकळी फुटल्यावर त्यात साखर आणि थोडी केशर मिक्स करा.

४. सुरुवातीला तयार केलेलं मिश्रण उकळत्या दुधात टाकून ते फ्रीजमध्ये ठेवा.

स्रोत

५. फ्रीजमध्ये ठेवून थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर थंडाई पिण्यास तयार होईल.

 

आहे की नाही सोप्पं ? चला तर मग, उद्याच्या धुळवडीची तयारी आजच करून घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required