व्हॉट्सअॅप हँग करणारा मेसेज आलाय ? फिकीर नॉट, हे आहे त्यामागचं साधं कारण...

ओ भाऊ, तुम्हाला व्हॉट्सअॅप हँग करणारा मेसेज आलाय का ? गंमत म्हणून तुम्ही क्लिक केलं आणि खरच व्हॉट्सअॅप हँग झाला...बरोबर ना ? हे असले मेसेज मोबाईलचे तीन तेरा करायला पुरेसे असतात. पण काय राव, हा मेसेज फक्त व्हॉट्सअॅप हँग करण्याचं काम करतो की यामागे आणखी काही हेतू आहे ? म्हायत नसल तर वाचा पुढं.....

कसंय रोज नवीन नवीन मेसेजेसने आपला व्हॉट्सअॅप ओसंडून वाहत असतो. त्यातलाच हा नवीन मेसेज डोकेदुखी ठरला आहे. खालील दिलेल्या अक्षरांवर किंवा काळ्या ठिपक्यावर क्लिक करा आणि तुमचा व्हॉट्सअॅप हँग होईल. आपण मनातल्या मनात म्हणतो ‘करून तर बघूया काय होतंय...’ किंवा ‘फेक वाटत आहे, क्लिक करून काय होणार हाये’.....असा विचार करून आपण क्लिक करतो आणि व्हॉट्सअॅप खरच हँग होतं की राव.

स्रोत

काय हाय ना मंडळी, असल्या मेसेज मधून आपल्या मोबाईल मधी व्हायरस सोडला जातो. आनी आपला डेटा चोरला जाऊ शकतो. हा पण तसलाच मेसेज हाये का ? याचा आम्ही तपास घेतल्यानंतर आमच्या हाती जी माहिती लागली ती अत्यंत दिलासा देणारी होती. चुकून जर तुमी मेसेजवर क्लिक केला असेल तर घाबरू नका. या मेसेजचा तुमच्या मोबाईलवर कोणताही साईड इफेक्ट होणार नाहीये. हा फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठी तयार करण्यात आलेला ‘प्रँक’ आहे राव.

मोबाईल हँग होण्यासाठी या मेसेज मध्ये काही विशिष्ट चिन्ह (special character) वापरलेली आहेत.  या चिन्हांमुळे तुमच्या व्हॉट्सअॅपच्या कामात अडथळे निर्माण होतात. आता सवाल असा आहे की या मेसेजची आयडिया कोणत्या महाभागाच्या डोक्यातून आलीये ? तर तो इसम सध्या अज्ञात आहे. त्याचा तपास लागलेला नाही.

मंडळी, एकंदरीत घाबरायचं कारण नाय. पन जर तुम्हाला भीती वाटत असल तर हा मेसेज डायरेक्ट डिलीट करून टाकायचा....

 

आणखी वाचा :

व्हॉटसअँप अपडेट : व्हॉट्सअॅप अॅडमिन, सावधान !! आता ग्रुपमेंबर तुम्हांला ग्रुपमधून हाकलू शकतात !!

आता व्हॉट्सअॅपवरच्या डिलीट केलेल्या फाईल्सही पुन्हा मिळवा...

सबस्क्राईब करा

* indicates required