आता व्हॉट्सअॅपवरच्या डिलीट केलेल्या फाईल्सही पुन्हा मिळवा...

काहीवेळा व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो, व्हिडीओ किंवा फाईल्स चुकून डिलीट होतात. व्हॉट्सअॅपवरून डिलीट झालेल्या फाईल्स पुन्हा मिळवण्यासाठी आजवर कोणताही ऑप्शन नव्हता. त्यामुळे बरीच अडचण व्हायची. पण आता या पुढे ती अडचण होणार नाही, कारण व्हॉट्सअॅपने डिलीट झालेल्या फाईल्स पुन्हा मिळवण्यासाठी नवीन फिचर आणलं आहे.

पूर्वी व्हॉट्सअॅपवर एखादी फाईल आली की ती डाऊनलोड करण्यासाठी ३० दिवस दिले जायचे. एकदा का तुम्ही ती फाईल डाऊनलोड केली की व्हॉट्सअॅपच्या सर्व्हर मधून ती फाईल कायमची डिलीट व्हायची. आता नवीन बदलानुसार फाईल डाऊनलोड केल्यानंतरही ती फाईल व्हॉट्सअॅपच्या सर्व्हर मध्ये राहणार आहे. म्हणजेच तुमची फाईल मोबाईल मधून डिलीट झाली तरी व्हॉट्सअॅपकडे ती फाईल ‘स्टोर’ केलेली असेल आणि तुम्ही ती डाऊनलोड करू शकता. 

स्रोत

व्हॉट्सअॅपने नुकतीच या फिचरची चाचणी केली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचं सांगितलं जातंय. मंडळी फेसबुकच्या डेटा लिकची केस सध्या ताजी असताना आता नवीन प्रश्न पडतो की व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या फाईल्स जर व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर कायमच्या स्टोर केल्या जातील, तर तो डेटा सुरक्षित राहील का ? व्हॉट्सअॅपने याबद्दल म्हटलंय की या फाईल्स end-to-end encryption द्वारे सुरक्षित ठेवण्यात येतील.

हे नवीन फिचर कधी येणार आहे याबद्दल तूर्तास तरी कोणतीही घोषणा झालेली नाही.

 

आणखी वाचा :

व्हॉट्सऍपवर ब्ल्यू टिक बंद केली आहेत?? आता या ट्रिकमुळे लोकांना तरीही कळेल तुम्ही मेसेज वाचला की नाही...

का आहे हाईक मेसेंजर व्हाट्सअॅप पेक्षाही वरचढ? : वाचा हाईक वर मिळणाऱ्या या १० अनोख्या फीचर्स बद्दल...

खोट्या WhastApp वेबसाईटपासून सावधान...

सबस्क्राईब करा

* indicates required